Happy B'Day Bradman : होय, हे खरं आहे! ब्रॅडमन यांनी तीन षटकांत केलं होतं शतक

Happy B'Day Bradman : होय, हे खरं आहे! ब्रॅडमन यांनी तीन षटकांत केलं होतं शतक

महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हे जगातील एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांनी 99 पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यांचे अनेक विक्रम आजही मोडणं कठीण आहे.

  • Share this:

लंडन, 27 ऑगस्ट : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरु आहे. यात दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला जोफ्रा आर्चरचा बाऊन्सर लागला. त्यामुळं तिसऱ्या सामन्यात तो फलंदाजीला उतरला नाही. फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी बॉडी लाईन गोलंदाजीचा प्रयोग पहिल्यांदा झाला तो ऑस्ट्रेलियाचेच महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यावर. त्यांना रोखण्यासाठी अॅशेस मालिकेतच उसळत्या चेंडूचा मारा करण्यात आला.

महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 1908 मध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या ब्रॅडमन यांचा आज 112 वा वाढदिवस. त्यांच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासतील एकमेव असा विक्रम आहे जो मोडणं अशक्य आहे. 1931 मध्ये त्यांनी हा विक्रम केला आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी 1931 मध्ये फक्त तीन षटकांत शतक साजरं केलं होतं. ब्लॅकहीथ इलेव्हनकडून खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. या खेळीत त्यांनी 14 षटकार आणि 29 चौकारांच्या मदतीनं 256 धावा केल्या होत्या.

तीन षटकांत शतक हे अशक्य वाटत असलं तरी सत्य आहे. त्यावेळी एका षटकात सहा नाही तर आठ चेंडू टाकले जात होते. ब्रॅडमन यांनी तीन षटकांत 24 चेंडू खेळले होते. यातील 22 चेंडूतच शतक केलं होतं. पहिल्या षटकांत 33 धावा, दुसऱ्या षटकांत 40 आणि तिसऱ्या षटकांत 27 धावा केल्या होत्या.

ब्रॅडमन यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिलं शतक वयाच्या 12 व्या वर्षी केलं होतं. 1920-21 मधअये बॉवरल स्कूलकडून खेळताना त्यांनी नाबाद 115 धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रॅडमन यांनी धावांचा पाऊस सुरू केला. एका संघाविरुद्ध कसोटीत 5 हजार धावा करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांनी कसोटीत 5 हजार 28 धावा केल्या.

SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचे 4 बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार; तारीखही ठरली!

First Published: Aug 27, 2019 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading