सिंधु, श्रीकांत आणि प्रणीथची अॉस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

सिंधु, श्रीकांत आणि प्रणीथची अॉस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये  धडक

पी व्ही सिंधु ,किदंबी श्रीकांत,आणि बी साई प्रणीथ यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपउपांत्य फेरीत धडक मारलीयं.

  • Share this:

भारताचे तीन बॅडमिन्टनपटू पी व्ही सिंधु ,किदंबी श्रीकांत,आणि बी साई प्रणीथ यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीयं.

इन्डोनेशियन ओपन जिंकणाऱ्या किदंबी श्रीकांतने जगातल्या नं1 सोन वान हो चा 15-21,21-13,21-13 असा 57 मिनीटात पराभव केला आणि मेन्स सिंगलच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली .तर प्रणीथने चीनच्या हुआंग युझिआंगचा ,21-15,18-21,21-13 असा 64 मिनीटात पराभव केला.आता प्रणीथ आणि श्रीकांत उपउपांत्य फेरीत एकमेकाशी भिडतील.

वुमन सिंगल्समध्ये पी.व्ही सिंधुने चेनचा 21-13 21-18 असा 46 मिनीटात पराभव केला.पुढच्या फेरीत ती थायलंडच्या रत्चानोक इन्ट्रानोनशी किंवा जगात नं1 असणाऱ्या ताय झु यिंगशी भिडू शकते.

आता आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये तरी भारताचं नाण चालेल अशी अपेक्षाय.

First published: June 22, 2017, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading