लंडन, 23 जुलै : अमेरिकेची दिग्गज टेनिसस्टार सेरेना विल्यम्सला पराबूत करून रोमानियाच्या सिमोना हालेपनं विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं. विम्बल्डन चॅम्पियन होणारी ती पहिली रोमन खेळाडू ठरली आहे. सेरेनाला अंतिम फेरीत 6-2,6-2 अशा फरकाने पराभूत केलं.
सिमोना हालेपसमोर सातवेळा विजेत्या सेरेना विल्यम्सचं आव्हान होतं. तरीही तिने दोन्ही सेटमध्ये बाजी मारत विजेतेपद पटकावलं. हालेपनं तिची स्वप्नवत कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरलं. हे तिचं पहिलंच विम्बल्डन विजेतेपद आहे.विजेतेपद पटकावल्यानंतर सिमोना हालेपनं प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी यापेक्षा चांगला सामना कधीच खेळले नव्हते.
"Have you ever played a better match than that?"
— Wimbledon (@Wimbledon) July 13, 2019
"Never!"@Simona_Halep speaks as a #Wimbledon champion for the first time... pic.twitter.com/0VRfeD628L
हालेपनं सेमीफायनलमध्ये युक्रेनच्या इलिना स्वितोलिनाला पराभूत केलं होतं. एक तास चाललेल्या सामन्यात 6-1, 6-3 अशा फरकाने इलिनाला नमवत फायनल गाठली होती. हालेपनं याआधी 2018 ची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. ती पाचव्यांदा ग्रँण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहचली होती.
अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या सेरेना विल्यम्सने सेमीफायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या बरबोरा स्ट्राइकोव्हाला 6-1, 6-2 ने पराभूत केलं होतं. सेरेनाने 11 व्यांदा फायनलमध्ये धडक मारली होती. या पराभवाने सर्वाधिक 24 ग्रँण्डस्लॅम जिंकण्याचा विक्रम मोडता आला नाही. मार्गारेट कोर्टच्या नावावर हा विक्रम आहे. मुलीच्या जन्मानंतर मोठ्या स्पर्धेत खेळून जिंकण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं. ऑस्ट्रेलिया ओपन 2017 जिंकल्यानंतर तिला एकही विजेतेपद जिंकता आलं नाही.
ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?