मुंबई, 29 ऑक्टोबर : सध्या सुरु असलेल्या आयपीएल टी-20 (IPL 2020) स्पर्धेत एम एस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) उत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर धोनीवर टीका केली जात आहे. काही माजी खेळाडू देखील धोनीविषयीची त्यांचे मत व्यक्त करत आहेत. त्यातच न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि समालोचक सायमन डूलने (Simon Doull) धोनीविषयी आपलं मत व्यक्त केल्यानंतर धोनीच्या एका फॅनने ट्विट करत त्याच्यावर टीका केली होती. त्यावर सायमनने देखील पुन्हा या चाहत्याला उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धोनी आणि त्याचा संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करू शकला नाही. पण त्याचे चाहते त्याची बाजू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडत आहेत. एका चाहत्याने तर कॉमेंटेटर सायमन डूलला स्वतःचं काम करण्याचा आणि धोनीवर टीका न करण्याचा सल्ला दिला आहे. धोनीच्या या चाहत्याने केलेल्या ट्वीटनंतर सायमनने त्याला उत्तर देणारे ट्वीट केले आहे. सायमनने ट्विटरवर या धोनीच्या चाहत्याबरोबरच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये या चाहत्याने सायमनला स्वत:चे काम करण्याचा आणि धोनीवर टीका न करण्याची सूचना केली आहे. या चाहत्याने असे म्हटले आहे की, ‘प्रिय सायमन, कृपया एमएस धोनीवर टीका करणं थांबव. मला आशा आहे की तू तुझं काम करशील. तू तुझ्या कारकिर्दीत अशी विशेष कामगिरी केलेली नाहीस की तू धोनीसारख्या महान खेळाडूवर टीका करावी. मी तुझा पूर्ण आदर करतो, पण असल्या सवयींपासून दूर रहा!’
(हे वाचा-पुढच्या वर्षी धोनीकडे नसणार CSKचं कर्णधारपद? चेन्नईच्या सीईओनं केलं स्पष्ट)
त्यानंतर डूलने या मेसेजच्या स्क्रीनशॉट शेअर करत असं ट्वीट केलं आहे की, ‘खरंच मला वाईट वाटतंय प्रतीक पण तुला कॉमेंटेटरचं काम काय असतं याची माहिती नाही आहे. खेळावर आणि तो खेळणाऱ्या खेळाडूंवर मत मांडणं हेच कॉमेंटेटरचं काम असतं. तुझा दिवस चांगला जावो मित्रा #bizarre.’
Really sorry Pratik but in case you don’t understand the job of a commentator, it is to comment on the game and people playing it. Have a great day mate. #bizzare pic.twitter.com/j7S8wCw6sv
— Simon Doull (@Sdoull) October 27, 2020
त्यानंतर डूलचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या या उत्तराला आणि त्याचा पाठिंबा दर्शवला आहे.
महेंद्रसिंह धोनी याने मागील 15 वर्षांपासून भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहे. धोनीने या 15 वर्षांत भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील तो कर्णधार म्हणून देखील उत्तम होता. आपल्या पहिल्याच आयसीसी स्पर्धत त्याने भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
(हे वाचा-धोनीच्या जबऱ्या फॅननं घरावर काढलं त्याचं चित्र; अशी होती 'थाला'ची Reaction)
चेन्नई सुपर किंग्जला सलग 12 वर्ष आयपीएलच्या प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याची किमया देखील केली आहे. त्याचबरोबर तीन वेळा चेन्नईला आयपीएल जिंकवण्यात देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पण या आयपीएमध्ये चेन्नईला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेत चेन्नईला 12 सामन्यांपैकी 8 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला असून पॉईंट्स टेबलमध्ये देखील सर्वांत खालच्या स्थानावर चेन्नईचा संघ आहे. या स्पर्धेत धोनीनं आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 118 च्या स्ट्राईक रेटने 199 धावा केल्या आहेत.