नवी दिल्ली, 21 डिसेंबर: अंडर-19 वर्ल्डकप 2022 साठी (U-19 World Cup 2022 ) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. मात्र, क्रिकेट जगतात विशेष चर्चा सुरु आहे ती म्हणजे, गाजियाबादच्या सिद्धार्थ यादवची (Siddharth Yadav). त्याने मोठी संघर्ष करुन आपले स्थान संघात पक्के केले आहे.
गाजियाबादच्या कोटगावमध्ये सिद्धार्थचे वडील एक किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांची देखील क्रिकेटर बनण्याची मनापासून इच्छा होती परंतु ते नेट बॉलरच्या पुढे जाऊ शकले नाहीत. आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ वडीलांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी युएईमध्ये आशिया कप आणि वेस्ट-इंडीजमध्ये (West-Indies) अंडर-19 विश्वचषक खेळणार आहे.
वडील श्रवण म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थने बॅट हातात घेतली होती तेव्हाच मला वाटले होते की तो एक चांगला डावखूरा हाताचा फलंदाज बनणार आहे. आणि तिच भविष्यवाणी सिद्धार्थने खरी करुन दाखवली. त्याने खूप मेहनत केली आणि आज तो भारताच्या अंडर- 19 संघाचा भाग आहे.
8 व्या वर्षापासून सिद्धार्थने आपली मेहनत डबल केली, आणि याच मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. सिद्धार्थचे वडील श्रवण म्हणाले की सुरवातीला मी रोज 3 तास दुकान बंद करुन त्याचा सराव घेत असे.
ते म्हणाले, मी माझे दुकान दुपारी 2 वाजता बंद करायचो आणि मग आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मैदानात सरावा करत. त्यानंतर पुन्हा दुकान सुरू करत होतो. तसेच ते पुढे म्हणाले, तो इतका थकायचा की त्याला भान राहत नव्हते. सिद्धार्थच्या कुटुंबातील सर्वांनी त्याला साथ दिली नाही. त्याने अभ्यासात लक्ष घालावे अशी त्याची आजीची इच्छा होती. श्रावणने सांगितले की, त्याला हे जुगार खेळण्यासारखे वाटले. आयुष्य उद्ध्वस्त होईल. एक भटकंती असेल. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांचे एक स्वप्न होते, जे त्याला पूर्ण करायचे होते.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे. एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर. एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.
स्टँडबाय खेळाडू – ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंग राठोड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, World cup india