VIDEO : पर्दापणातच सिद्धेशनं केली 'ही' कमाल, जिंकल रोहितचं मन

VIDEO : पर्दापणातच सिद्धेशनं केली 'ही' कमाल, जिंकल रोहितचं मन

दरम्यान 1514 दिवसांनी पर्दापण करत असताना, पहिल्याच चेंडूत सिद्धेशनं कमाल केली.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई संघाला तारण्यासाठी मैदानाता उतरला तो, सिद्धेश लाड. पण प्रथम टॉस जिंकत मुंबई संघानं पंजाबला बॅटींग करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांची हवा लोकेश राहुलनं काढली. राहुलच्या शतकी खेळीनं मुंबईसमोर 198 धावांचे आव्हान ठेवले आहे.

दरम्यान मुंबईला दिलेल्या आव्हानाचं पाठलाग करत असताना, सलामीसाठी उतरलेला सिद्धेश लाड आणि क्विंटन डी’कॉक यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान 1514 दिवसांनी पर्दापण करत असताना, सिद्धेश लाड यांन पहिल्याच चेंडूत सिक्सर मारला.

यामुळं मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कमालीचा खुश झालेला पाहायला मिळाला. ड्रेसिंग रुममध्ये बसलेला असताना रोहित शर्मानं सिद्धेशच्या या शॉटचं कौतुक केलं. पण सिद्धेश केवळ 15 धावा करत बाद झाला.

विशेष म्हणजे सिध्देश लाड हा 2015पासून मुंबई इंडियन्स संघाकडं आहे. याचवेळी हार्दिक पांड्यालाही संघात घेण्यात आले होते. एकीएकडं हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे तर, सिध्देश लाडची हवा आहे ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये. विशेष म्हणजे सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेच सिद्धेशला संघाची कॅप दिली होती. सिद्धेश केवळ 15 धावा करत बाद झाला.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading