IPL 2019 : शाहरुखच्या 'या' नवख्या खेळाडूनं फेरले शाकिबच्या बर्थडे पार्टीवर पाणी

19व्या ओव्हरमध्ये कोलकताला जिंकण्यासाठी13 धावांची गरज होती. यावेळी कोलकताचा हा खेळाडू ठरला फिनीशर...

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 05:14 PM IST

IPL 2019 : शाहरुखच्या 'या' नवख्या खेळाडूनं फेरले शाकिबच्या बर्थडे पार्टीवर पाणी

कोलकता, 25 मार्च : रविवारचा (24 मार्च) दिवस गाजला तो फलंदाजांच्या धडाकेबाज फलंदाजांनी. कोलकताकडून आंद्रे रसेलनं आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. पण या सगळ्यात कोलकतासाठी अंडरडॉग म्हणून समोर आला तो, शुभमन गिल.

हैदराबादनं 182 धावांचा डोंगर हैदराबाद समोर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, कोलकताच्या सलामीच्या फलंदाजांनी आधीच नांगी टाकली. आपल्या किफायतीशीर गोलंदाजीसाठी हैदराबादचा संघ ओळखला जातो. त्यामुळे हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शाकिब अस हसनच्या 19व्या ओव्हरमध्ये कोलकताला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती. यावेळी कोलकताचा नवखा खेळाडू शुभमन गिलनं दोन सिक्स मारत कोलकताला सामना जिंकवून दिलं. विशेष गोष्ट म्हणजे काल शाकिब अल हसनचा वाढदिवस होता.


Loading...


मात्र कालचा दिवस काही शाकिबसाठी चांगला गेला नाही. शाकिबनं कालच्या सामन्यात 11.45च्या सरासरीनं 42 धावा देत केवळ एका फलंदाजाला बाद केलं. त्यातच शेवटच्या ओव्हरमध्ये शुभमननं लगावलेल्या दोन सिक्सनं शाकिबच्या बर्थडेवर पुरते पाणी फेरलं. 182 धावांचा पाठलाग करताना आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलनं केवळ 19 बॉलमध्ये 49 धावा केल्या. त्याच्या या इनिंगमध्ये रसेलनं चार चौकार आणि चार षटकारांची धुवाधार खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...