मुंबई, 27 मे : पावलं टाकणं दूर पण नीट बोलताही येत नव्हतं त्या वयातच क्रिकेटने बाळाच्या आयुष्यात एन्ट्री केली होती. अवघ्या ३ वर्षांचे वय असतानाच शुभमन गिलने बॅट हातात धरली होती. अर्थात तेव्हा फक्त बॅट हातात धरून टीव्हीवर खेळणाऱ्या खेळाडूंची कॉपी करत असे. शुभमन गिल घरात टीव्हीवर क्रिकेट बघत तसंच खेळण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हाच शुभमनचे वडील लखविंदर सिंह यांनी मुलाला घडवण्यासाठी धडपड सुरू केली.
क्रिकेटच्या आठवणी ताज्या करताना शुभमनने एका मुलाखतीत सांगितले की, वडील लखविंदर सिंह हेसुद्धा क्रिकेटचे मोठे चाहते होते आणि खेळाडूही होते. टीव्हीवर मॅच बघताना ते शुभमनलासुद्धा सोबत बसवायचे. शुभमन हवेत बॅट फिरवून खेळाडूंच्या शॉट्सची कॉपी करायचा. तेव्हाच वडिलांनी त्याला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहिलं. यानंतर शुभमनला त्यांनी लहान बॅटही आणून दिली होती.
नो प्लॅन इज प्लॅन! सूर्यकुमारला बाद कसं केलं? मोहितने सांगितली गुजरातची रणनिती
शुभमन गिल बॉलला मोठ्या दोऱ्याने बांधून फटके मारण्याची प्रॅक्टिस करायचा. त्याची प्रॅक्टिस पाहून वडिलांनी शेतात काम करणाऱ्या मजुरांना त्याला गोलंदाजी करायला लावली. त्यानंतर शुभमनची प्रॅक्टिस सुरू झाली. पंजाबच्या जमिनीत शेतातील मजुरांनी केलेल्या बॉलिंगवर सराव करत शुभमनने आपल्या क्रिकेटचा पाया उभारला. शुभमनच्या फलंदाजीने गेल्या दोन वर्षात भारतासह आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सलासुद्धा विजय मिळवून दिला आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामातलं शुभमनचं हे तिसरं शतक आहे. विशेष म्हणजे अखेरच्या चार सामन्यात त्याने ही कामगिरी केलीय. गेल्या पाच महिन्यातलं त्याचं हे आठवं शतक आहे. यात त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यातही शतके झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये खेळण्याआधी यंदाच्या वर्षात शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवलं आहे. त्याने 17 सामन्यात 18 डावात 980 धावा केल्या. यात त्याने 5 शतके आणि 1 अर्धशतक केलं आहे. यापैकी एका वनडेत त्याने द्विशतक झळकावताना 208 धावाही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023