मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शुभमनची 2023मध्ये 8 शतकं, 7 महिन्याआधीच्या निर्णयाने केली कमाल

शुभमनची 2023मध्ये 8 शतकं, 7 महिन्याआधीच्या निर्णयाने केली कमाल

गेल्या पाच महिन्यात शुभमन गिलचं आठवं शतक

गेल्या पाच महिन्यात शुभमन गिलचं आठवं शतक

Shubman Gill : आयपीएलमध्ये खेळण्याआधी यंदाच्या वर्षात शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवलं आहे. गेल्या पाच महिन्यातलं त्याने 8 शतके झळकावली आहेत.

अहमदाबाद, 27 मे : युवा फलंदाज शुभमन गिलसाठी यंदाचं वर्ष आतापर्यंत जबरदस्त राहिलं आहे. आयपीएल 2023 मध्ये क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने शतक झळकावलं. यंदाच्या हंगामातलं त्याचं हे तिसरं शतक आहे. विशेष म्हणजे अखेरच्या चार सामन्यात त्याने ही कामगिरी केलीय. गेल्या पाच महिन्यातलं त्याचं हे आठवं शतक आहे. यात त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यातही शतके झळकावली आहेत.

शुभमन गिलसाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम लकी आहे. त्याने 8 पैकी 4 शतके याच मैदानावर झळकावली आहेत. आता आयपीएलमध्ये तिसरं शतक झळकावल्यानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरच फलंदाजीचा गिअर बदलण्याचा निर्णय घेतला होता. तिथून फलंदाजीत काही बदल केले आणि त्याचा परिणाम आता दिसत आहे." ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौरा संपला होता आणि त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये भारत विरुद्ध न्यूझिलंड मालिका झाली होती.

IPL 2023 : शुभमनचा कॅच, फलंदाजी क्रम अन् खेळाडुंच्या दुखापतीने मुंबईला पराभवाची 'जखम'

शुभमन गिल म्हणाला की, टी२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडविरुद्ध मालिका झाली होती. या मालिकेआधी मी माझ्या खेळात काही टेक्निकल बदल केले होते. मी काही एरियावर काम केलं आणि याचा फायदा झाला. मुंबईविरुद्धची खेळी आयपीएलमधील माझी जबरदस्त खेळी होती. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात आणि तुम्ही मैदानावर जाता तेव्हा चांगलं करायचं असतं.

हार्दिक पांड्यानेही शुभमन गिलचं कौतुक केलं. आजची खेळी सुंदर अशी होती तो आजिबात गडबडल्याचं दिसला नाही. असं वाटत होतं की कुणी चेंडू टाकतं आणि तो मारतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरस्टार होईल. प्रत्येकजण आपली जबाबदारी घेतो आणि मला वाटतं चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमागे मोठं कष्ट लागतं.

आयपीएलमध्ये खेळण्याआधी यंदाच्या वर्षात शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवलं आहे. त्याने 17 सामन्यात 18 डावात 980 धावा केल्या. यात त्याने 5 शतके आणि 1 अर्धशतक केलं आहे. यापैकी एका वनडेत त्याने द्विशतक झळकावताना 208 धावाही केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2023