अहमदाबाद, 03 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या फॉर्ममध्ये आहे. तीनही फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने शतक झळकावलं. त्याच्या चाहत्यांची संख्या आता वाढत चालली आहे. यात तरुणींचाही समावेश आहे. एका तरुणीने अहमदाबाद स्टेडिमयवर हातात बोर्ड घेत त्यावर टिंडर, शुभमनसे मॅच करा दो असं लिहिलं होतं. पण याचवेळी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने मैदानातून दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होतेय.
शुभमन गिलने बुधवारी झालेल्या सामन्यात ६३ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी केली. भारताकडून टी२० मध्ये शतक करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला. या सामन्यात शुभमन गिलला प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आले. शुभमन गिलने मैदानात चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. तेव्हा स्टेडियममध्ये एका तरुणीने हातात घेतलेल्या प्लेकार्डचा फोटो व्हायरल झाला.
हेही वाचा : Joginder Sharma: धोनीसोबत पदार्पण, फक्त 8 सामन्यांची कारकिर्द; 19 वर्षांनी निवृत्ती
टिंडर या डेटिंग एपवर लोक एककमेकांना भेटतात. सामना संपल्यानंतर जेव्हा गिल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी गेला तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले लोक महिला फॅनसोबत चिअर करायला लागले. त्यावेळी भारतीय खेळाडू सीमारेषेजवळ होते. अर्शदीपही तिथे होता, त्याने हाताने क्रॉस करत तरुणीला नाही असं असा इशारा केला.
“Tujhe dekh ke hass rahi hai” vibes 😂😂 pic.twitter.com/oaB2r2YQc8
— Shivani (@meme_ki_diwani) February 2, 2023
दरम्यान, शुभमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान त्याच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. एका रेस्टॉरंटमध्ये ते दोघे बसल्याचं सांगताना दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातंय. याआधी शुभमन गिलचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशीसुद्धा जोडण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket