मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट?

शुभमन गिल म्हणतो, रोहित सांगतो रिस्क कधी घ्यायची, पण विराट?

टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) उत्सुक आहे. या दौऱ्याआधी गिलने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 मे : टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) उत्सुक आहे. या सामन्यासाठी यापेक्षा चांगली तयारीची संधी मिळाली नसती, असं गिल म्हणाला आहे. इंग्लंडमधल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रत्येक सत्रावर लक्ष देणं गरजेचं असतं, असं गिलने सांगितलं. शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसह मुंबईत 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर इंग्लंडचा त्याचा हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्याआधी गिलने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्ये गिलला चांगली कामगिरी करता आली नाही, पण याची भरपाई करण्यासाठी आता तो तयार आहे. 18 जून पासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिले भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल.

'आम्ही ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली, परदेशामध्ये आम्ही चांगलं प्रदर्शन करत आहोत. फायनलसाठी आम्ही यापेक्षा चांगली तयारी करू शकत नाही. ओपनिंग बॅट्समन असल्यामुळे तुम्हाला फक्त इंग्लंडमध्येच नाही, तर परदेशातही प्रत्येक सत्रानुसार खेळण्यात तुम्हाला सक्षम असावं लागतं,' असं गिल म्हणाला.

'इंग्लंडमध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असतं, तेव्हा बॉल जास्त स्विंग होतं, तसंच जेव्हा उन येतं तेव्हा बॅटिंग करणं सोपं असतं. ओपनर म्हणून तुम्हाला या परिस्थितीचं आकलन करणं महत्त्वाचं आहे. क्वारंटाईन कालावधी खूप कडक आहे. तुम्हाला 14 दिवस एका खोलीत राहावं लागतं. तुमच्याकडे करण्यासारखंही काही नसतं. आम्हाला प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम सांगण्यात आला आहे. चित्रपट बघण्यात आम्ही वेळ घालवतो, पण तरीही हा काळ कठीण आहे,' अशी प्रतिक्रिया गिलने दिली.

गिलने भारताकडून आतापर्यंत 7 टेस्ट खेळल्या आहेत. मेलर्बन टेस्टमधून त्याने पदार्पण केलं. या काळात रोहित आणि विराटसोबत काय बोलणं झालं? याबाबत गिलने सांगितलं. 'विराट कोहलीसोबत जेव्हा चर्चा होते तेव्हा तो मला कशाचीही पर्वा न करता खेळायला सांगतो. तो मानसिकतेबाबत खूप बोलतो आणि स्वत:चे अनुभव सांगतो. पण रोहितसोबत बोलतो तेव्हा तो बॉलर कुठे बॉल टाकेल, परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार धोका कधी पत्करायचा आणि कधी नाही, हे सांगतो,' असं गिल म्हणाला.

First published:

Tags: Cricket, Rohit sharma, Team india, Virat kohli