'T20 वर्ल्ड कप नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळायची', टीम इंडियाच्या खेळाडूचं स्वप्न

'T20 वर्ल्ड कप नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळायची', टीम इंडियाच्या खेळाडूचं स्वप्न

टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळेल. 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये फायनल खेळवली जाईल.

  • Share this:

मुंबई, 12 मे : टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळेल. 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये फायनल खेळवली जाईल. विराट कोहलीला (Virat Kohli) अजूनही त्याच्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे त्यालाही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. टीमचा युवा ओपनर शुभमन गिलही (Shubhaman Gill) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत उत्सुक आहे.

क्रिकइन्फोशी बोलताना शुभमन गिलला टी-20 वर्ल्ड कप का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळणं तुझं स्वप्न आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने आपल्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळायची आहे, असं उत्तर दिलं. या सामन्यामध्ये शुभमन गिलला रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगची संधी मिळू शकते, कारण त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती.

भूतकाळातल्या टीम इंडियाच्या कोणत्या मॅचमध्ये खेळायची तुझी इच्छा होती? असंही शुभमन गिलला विचारण्यात आलं, तेव्हा त्याने आपल्याला 2011 वर्ल्ड कपची फायनल खेळायची होती असं सांगितलं. 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

टी-20 वर्ल्ड कप जिंकून वडिलांना गिफ्ट द्यायचं आहे, असंही शुभमन गिल म्हणाला.

Published by: Shreyas
First published: May 12, 2021, 10:55 PM IST

ताज्या बातम्या