Home /News /sport /

IND vs ENG : शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, टीम इंडियाला हवे दोन नवे ओपनर

IND vs ENG : शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, टीम इंडियाला हवे दोन नवे ओपनर

इंग्लंड दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) याला दुखापत झाल्याचं वृत्त आधीच समोर आलं होतं, पण आता गिल संपूर्ण इंग्लंड दौऱ्याला मुकणार आहे.

    लंडन, 5 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) याला दुखापत झाल्याचं वृत्त आधीच समोर आलं होतं, पण आता गिल संपूर्ण इंग्लंड दौऱ्याला मुकणार आहे. गिलच्या पायाच्या नळीला दुखापत झाली आहे, या दुखापतीतून बरं व्हायला त्याला कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधून बाहेर झाला आहे. पश्चिम बंगालचा ओपनर अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) सध्या टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये आहे. 2019-20 च्या रणजी मोमसात अत्यंत खराब कामगिरी केली, यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात भारत ए कडून खेळतानाही अभिमन्यू इश्वरनला संघर्ष करावा लागला. यानंतरही त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. देवदत्त पडिक्कल आणि पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये असतानाही त्यांच्याऐवजी अभिमन्यू इश्वरनला संधी दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता गिलला दुखापत झाल्यानंतर टीम मॅनेजमेंट इश्वरनचा ओपनर म्हणून विचार करत नाहीये. 'गिल इंग्लंड सीरिजमधून बाहेर झाला आहे, पायाच्या नळीला झालेली दुखापत बरी व्हायला तीन महिन्यांचा काळ लागेल. टीम इंडियाच्या मॅनेजरनी निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना इंग्लंडला आणखी दोन ओपनर पाठवण्याचा ई-मेल पाठवला आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन ओपनरची विनंती करण्यात आली असली तरी चेतन शर्मा (Chetan Sharma) आणि टीम मॅनेजमेंट एकाच पानावर असल्याचं दिसत नसल्याचं बोललं जात आहे, कारण इंग्लंडला पाठवण्यासाठी टीमने शॉ (Prithvi Shaw) किंवा पडिक्कल (Devdutt Padikkal) यांची नावं बीसीसीआयला पाठवलेली नाहीत. 26 जुलैला भारताचा श्रीलंका दौरा (India vs Sri Lanka) संपत आहे, त्यानंतर हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होऊ शकतात, पण क्वारंटाईन नियमांमुळे अडथळा येणार आहे. 'बीसीसीआय (BCCI) अध्यक्षांना शॉ आणि पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्याबाबत अजून कोणतीही अधिकृत विनंती करण्यात आलेली नाही. वनडे आणि टी-20 सीरिजसाठी दोन्ही खेळाडू श्रीलंकेत आहेत. 26 जुलैनंतर दोन्ही खेळाडू इंग्लंडला जाऊ शकतात, पण टीम प्रशासनाला डरहॅममध्ये बायो-बबलमध्ये जाण्याआधीच हे दोन खेळाडू हवे आहेत,' असं सूत्राने सांगितलं. 13 जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 खेळवल्या जातील, तर भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Team india

    पुढील बातम्या