मुंबई, 18 जानेवारी : न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर असून यांच्यात सध्या वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा युवा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध द्विशतक ठोकले आहे. अतिशय अतितटीच्या या सामन्यात भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याने द्विशतकीय कामगिरी केली. त्याने ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहित शर्मा आणि ईशांतचा रेकॉर्ड त्यांच्याच डोळ्या देखत तोडला. शुभमन गिलचे वनडे सामन्यातील हे सलग तिसरे शतक असून त्याने पुन्हा एकदा त्याची प्रतिभा सिद्ध केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताची फलंदाजीची सुरुवात फार काही चांगली राहिली नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या हे सर्व खेळाडू स्वस्तात माघारी परतले. परंतु शुभमन गिलने भारतीय संघाची खिंड अखेर पर्यंत लढवली. यात त्याने द्विशतकाला गवसणी घाली. त्याने केवळ 88 चेंडूत त्याचे पहिले शतक पूर्ण केले. तर पुढील ५७ चेंडूत दुसरे शतक झळकावले. अशा प्रकारे शुभमन हा वनडे सामन्यात द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
रोहित शर्माने 2013 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विरोधात द्विशतक करण्याची कामगिरी केली होती. तर यानंतर ईशान किशनने रोहितचा रेकॉर्ड मोडत 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 24 व्या वर्षी द्विशतक केले होते. आता शुभमन गिलने सर्वांना मागे टाकत अवघ्या 23 व्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात द्विशतक ठोकले आहे. यानंतर शुभमनचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma