Deodhar Trophy : नव्या ‘विराट’ पर्वाला सुरुवात, युवा खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम

Deodhar Trophy : नव्या ‘विराट’ पर्वाला सुरुवात, युवा खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम

भारताच्या युवा खेळाडूनं मोडला विराटचा सर्वात स्पेशल विक्रम.

  • Share this:

रांची, 04 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी खेळाडू कोणी असेल तर तो आहे विराट कोहली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतासाठी सर्वात लकी ठरला आहे. एवढेच नाही तर धावांच्या आणि विक्रमांच्या बाबतीतही विराट कोहली सर्वात अग्रेसर आहे. एकेकाळी सर्व विक्रमांवर राज्य करणाऱ्या सचिन तेंडुलकरला विराटनं मागे टाकले. आता विराटला मागे टाकणारा एक युवा खेळाडू टीम इंडियात सामिल होऊ शकतो.

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गीलची ओळख (Shubamn Gill) भारतीय संघाचे भविष्य म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये शुबमन गील खोऱ्यानं धावा काढत आहे. त्यामुळं त्याला भारतीय कसोटी संघातही जागा मिळाली आहे. दरम्यान आता शुबमन गीलनं एक विक्रमी कामगिरी केली आहे. गीलनं चक्क कर्णधार विराट कोहलीच्या एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

गीलनं देवधर ट्रॉफीमध्ये विराटचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. देवधर ट्रॉफीमध्ये गीलनं शानदार कामगिरी केली आहे. इंडिया सी संघाकडून खेळणाऱ्या गीलनं इंडिया ए विरोधात 143 धावांची तुफानी खेळी केली. आजच्या इंडिया बी विरोधात गीलला चांगली फलंदाजी करता आली नाही. मात्र तरी त्यानं विराटचा 10 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

शुबमन गीलकडे देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी संघाचे कर्णधारपद होते. सर्वात कमी वयात देवधर ट्रॉफीमध्ये कर्णधार झालेला गील पहिला खेळाडू आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीनं 2009-10मध्ये 21व्या वर्षी देवधर ट्रॉफीच्या फायनलमध्ये नेतृत्व केले होते. याबाबत आता दिल्लीचा उन्मुक्त चंद तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता 20व्या वर्षी शुबमन गील कर्णधार झाला आहे.

वाचा-दुर्दैवी! कुस्तीच्या मैदानातच पैलवानाचा मृत्यू, कोसळल्यानंतर पुन्हा उठलाच नाही

वाचा-पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

दरम्यान आज झालेल्या अंतिम सामन्यात इंडियानं बीनं प्रथम फलंदाजी करत 283 धावांपर्यंत मजल मारली. यात केदार जाधवनं 86 धावांची तुफानी खेळी केली. तर, इंडिया सीकडून इशान पटेलनं पाच विकेट घेतल्या. मात्र इंडिया बीनं दिलेल्या आव्हाना पाठलाग करताना इंडिया सीला 50 ओव्हरमध्ये केवळ 232 धावा करता आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या