World Cup 2019 : श्रीकांत म्हणतो...धोनीनं वर्ल्ड कपआधी स्वार्थ सोडावा आणि 'हे' करावं

World Cup 2019 : श्रीकांत म्हणतो...धोनीनं वर्ल्ड कपआधी स्वार्थ सोडावा आणि 'हे' करावं

विश्वचषकात यष्टीरक्षक मेहंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला करण्यात आली. त्यानंतर अनेक वाद झाले, मात्र तरी भारतीय संघ हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

दरम्यान या विश्वचषकात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक मेहंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. मात्र, धोनीची तंदुरुस्ती हा भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व धोनी करत असून, गेल्या काही सामन्यात तो थकलेला जाणवला. त्यामुळं विश्वचषक स्पर्धेआधी धोनीनं किमान २ सामन्यांसाठी तरी विश्रांती घ्यावी, असे मत माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राकडे व्यक्त केले आहे.

विश्वचषक ही सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेआधी सर्व खेळाडूंनी विश्रांती घ्यावी त्यामुळं स्पर्धकांनी स्वार्थ सोडावा आणि विश्रांती घ्यावी, असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केलं.

धोनीला सध्या पाठदुखीचा त्रास होत आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पाठदुखीने उचल खाल्ली होती. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र त्यानं किमान दोन ते तीन सामन्यात विश्रांती घेण्याची गरज आहे.मात्र विश्वचषकासाठी धोनीनं स्वार्थ सोडावा आणि आराम करावा, असं मत आता क्रिकेट चाहतेही व्यक्त करत आहेत.

महेंद्रसिंग धोनी हा 2011 आणि 2015च्या विश्वचषकात महत्वाचा खेळाडू ठरला होता. त्यामुळं त्याचा अनुभव संघासाठी महत्वपुर्ण असेल. आयपीएलमध्ये धोनीनं २३० धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणात 'तो' दम नाही - मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading