मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात ऐनवेळी बदल, या मुंबईकर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात ऐनवेळी बदल, या मुंबईकर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात ऐनवेळी बदल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात ऐनवेळी बदल

Ind vs SA: दक्षिण आप्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्या आणि आता अष्टपैलू दीपक हुडालाही विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. त्यांच्या जागी दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 26 सप्टेंबर: बुधवारपासून भारत-दक्षिण आफ्रिका संघांमध्ये टी20 मालिका खेळवली जाणार आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयनं आधीच संघाची घोषणा केली होती. पण आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं बीसीसीआयच्या निवड समितीनं अंतिम क्षणी संघात काही बदल केले आहेत. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याला आधीच विश्रांती देण्यात आली होती. आणि आता अष्टपैलू दीपक हुडालाही विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. त्यांच्या जागी दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यात वर्ल्ड कपसाठी स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत असलेल्या मुंबईकर खेळाडूचा समावेश आहे.

श्रेयस-शाहबाजला संधी

अष्टपैलू दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे वर्ल्ड कपला निघण्यापूर्वी श्रेयसला काही सामने खेळायला मिळतील अशी आशा आहे. वर्ल्ड कपसाठी श्रेयसचा स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेस करण्यात आला आहे. याशिवाय हार्दिक पंड्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डावखुऱ्या शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा - Hardik Pandya: जेव्हा हार्दिक पंड्या पहिल्यांदा सासरच्या मंडळींना भेटतो... हार्दिकनं शेअर केला इमोशनल Video

उमेश यादव संघासोबत कायम

दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या जागी उमेश यादवचा संघात ऐनवेळी समावेश करण्यात आला होता. तीन सामन्यांच्या त्या मालिकेत मोहाली टी20त उमेशला अंतिम अकरातही जागा मिळाली होती. तोच उमेश यादव आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही संघासोबत कायम असणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार शमी अजूनही कोरोतून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्याजागी उमेश यादव संघात कायम राहणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक

दक्षिण आफ्रिकेशी भारतीय संघ 3 टी20 सामने खेळणार आहे. तिरुअनंतपुरममध्ये उभय संघातला पहिला टी20 मुकाबला होणार आहे. त्यासाठी तेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकन संघ भारतात दाखल झाला आहे. काल तिरुअनंतरपुरममध्ये या संघाचं स्वागत करण्यात आलं. टी20 मालिकेसह दक्षिण आफ्रिकन संघ या दौऱ्यात तीन वन डे सामनेही खेळणार आहे. दरम्यान आज दक्षिण आफ्रिकन संघानं सरावालाही सुरुवात केली.

भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20 मालिका

पहिला टी20 सामना – 28 सप्टेंबर, त्रिवेंद्रम

दुसरा टी20 सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी

तिसरा टी20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदूर

हेही वाचा - Cricket: धक्कादायक... लंडनमध्ये भारतीय खेळाडूच्या रुममध्ये चोरी, कॅश-दागिने गायब

भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे मालिका

पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, रांची

दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ

तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

टी20 मालिकेतले सर्व सामने हे संध्याकाळी 7.00 वाजता तर वन डे मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 world cup 2022