Home /News /sport /

Shreyas Iyer हातावर K स्टिकर चिटकवून का खेळतोय? के अक्षरामागचं सिक्रेट उलगडलं!

Shreyas Iyer हातावर K स्टिकर चिटकवून का खेळतोय? के अक्षरामागचं सिक्रेट उलगडलं!

मागच्या काही काळापासून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) क्रिकेट खेळताना बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच दिसली असेल. श्रेयस अय्यर मॅचसाठी मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या हातावर K अक्षर असलेला स्टिकर चिटकवेला असतो, यानंतर अनेकांना या अक्षराचा अर्थ नेमका काय आहे? असा प्रश्न पडला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जून : मागच्या काही काळापासून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) क्रिकेट खेळताना बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच दिसली असेल. श्रेयस अय्यर मॅचसाठी मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या हातावर K अक्षर असलेला स्टिकर चिटकवेला असतो, यानंतर अनेकांना या अक्षराचा अर्थ नेमका काय आहे? असा प्रश्न पडला. काहींनी श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधार असल्यामुळे हे स्टिकर लावत असल्याचं सांगितलं, पण यामागचं सत्य काही वेगळंच आहे. श्रेयस अय्यरने चिटकवलेलं हे स्टिकर एक फिटनेस गॅजेट आहे, जे रियल टाईम ब्लड ग्लुकोसचं मॉनिटरिंग करतं, तसंच हेल्थ अपडेट देतं. श्रेयस अय्यर वापरत असलेलं हे फिटनेस गॅजेट खूप महाग आहे. बँगलोरच्या अल्ट्राह्यूमन नावाच्या स्टार्टअपने हे गॅजेट तयार केलं आहे. श्रेयस अय्यरने या स्टार्टअपसोबत करार केला आहे, त्यामुळे तो मॅचमध्ये हे प्रोडक्ट वापरून खेळतो. या प्रोडक्टचं नाव अल्ट्राह्यूमन एम-1 आहे. हे गॅजेट आयफोन अॅप अल्ट्राह्यूमनशी जोडलं गेलेलं आहे. या गॅजेटच्या मदतीने तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतची प्रत्येक अपडेट घेऊ शकता. गॅजेट सांगतं खायची, झोपायची, वर्क आऊटची वेळ हे गॅजेट ब्लड ग्लुकोससोबतच इतर बायो मार्करही ट्रॅक करून मेटाबॉलिक फिटनेसवर फोकस करतं. तसंच यामध्ये बायो सेन्सरही आहे, ज्याला तुमच्या ट्रायशेपवर चिटकवावं लागतं. ज्यांची ब्लड ग्लुकोज लेव्हल प्रत्येक मिनिटाला बदलतं, त्यांच्यासाठी हे गॅजेट महत्त्वाचं आहे. तुमच्या शरिरामध्ये किती एनर्जी शिल्लक आहे, तसंच तुम्हाला कधी झोपायची गरज आहे, कधी खाणं खाल्लं पाहिजे आणि वर्क आऊट कधी केलं पाहिजे, हे सगळं या गॅजेटच्या माध्यमातून कळतं. कोण आहेत अल्ट्राह्यूमनचे संस्थापक? अल्ट्राह्यूमनचे संस्थापक मोहित कुमार आणि वत्सल सिंघल आहेत. या दोघांनी याआधी हायपर लोकल लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी 'Runnr' सुरू केलं होतं. ज्याला झोमॅटोने 2017 साली अधिग्रहित केलं होतं. काही वर्ष झोमॅटोसोबत काम केल्यानंतर मोहित आणि वत्सल यांनी नवीन स्टार्टअपने सुरू केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shreyas iyer

    पुढील बातम्या