Home /News /sport /

श्रीलंका दौऱ्यावर जाणार नाही टीम इंडियाचा खेळाडू, मिळाली असती कॅप्टन्सी

श्रीलंका दौऱ्यावर जाणार नाही टीम इंडियाचा खेळाडू, मिळाली असती कॅप्टन्सी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) भारतीय टीम इंग्लंडमध्ये असेल तेव्हाच दुसरी टीम इंडिया श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) वनडे आणि टी-20 सीरिज खेळण्यासाठी जाईल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) भारतीय टीम इंग्लंडमध्ये असेल तेव्हाच दुसरी टीम इंडिया श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) वनडे आणि टी-20 सीरिज खेळण्यासाठी जाईल. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल? याची उत्सुकता चाहत्यांना आहे, पण यातलं एक नाव आता स्पर्धेतून बाहेर झालं आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे श्रीलंकेला जाणार नाही. इंग्लंडविरुद्ध्या सीरिजमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला आयपीएलमध्येही (IPL 2021) खेळता आलं नव्हतं. 8 एप्रिलला श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर पुढचे तीन महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही. याच कारणामुळे तो श्रीलंका दौऱ्यावरही जाऊ शकणार नाही. वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली आहे. 22 मॅचमध्ये 42 च्या सरासरीने त्याने 813 रन केले आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याला 29 सामने खेळून 550 रन करता आले. श्रेयस अय्यर फिट असता तर तो श्रीलंकेला गेला असता, तसंच त्याला विराट आणि रोहितच्या गैरहजेरीत टीमचं नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली असती. आता टीमचं नेतृत्व करण्याच्या रेसमध्ये शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका दौऱ्यात 13 जुलैला पहिली वनडे होईल, तर 16 आणि 19 जुलैला उरलेल्या दोन्ही मॅच खेळवल्या जातील. तर 22 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 24 जुलैला दुसरी टी-20 आणि 27 जुलैला तिसरी टी-20 होईल. भारताची संभाव्य टीम पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, Shreyas iyer, Team india

    पुढील बातम्या