Home /News /sport /

भर मैदानात वेंकटेशवर भडकला कॅप्टन श्रेयस अय्यर, नेमकं झाल तरी काय? VIDEO

भर मैदानात वेंकटेशवर भडकला कॅप्टन श्रेयस अय्यर, नेमकं झाल तरी काय? VIDEO

rr vs kkr

rr vs kkr

कोलकाता नाईट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (rajasthan royals)यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात केकेआरला हंगामात चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

    मुंबई, 19 एप्रिल: कोलकाता नाईट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (rajasthan royals)यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात केकेआरला हंगामात चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाताचा 7 धावांनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर(Shreyas Iyer) भलताच संतापलेला दिसला. सहकारी खेळाडू वेंकटेश अय्यरवर (Venkatesh Iyer) ओरडातानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या 16 व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर वेंकटेशने डीप बॅकवर्ड पॉईंटवर शॉट खेळला. यावर श्रेयसला दोन रन्स काढायचे होते. मात्र वेंकटेशने त्यास नकार दिला. वेंकटेशकडून दुसरा रन्स काढण्यास नकार दिल्यामुळे श्रेयस खूप चिडला होता आणि ओरडून वेंकटेशवर राग काढण्यास सुरूवात केली. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाताचा 7 धावांनी पराभव झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआरला विजयासाठी 218 धावांचे आव्हान दिले होते. मात्र केकेआरचा संघ 210 धावांवर ऑलआऊट झाला. KKR च्या कमिन्स-शिवम या जोडीचा बाऊंड्री लाईनजवळ अप्रतिम कॅच, VIDEO
    श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 51 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. मात्र अय़्यर संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 217 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून जोस बटलरने शानदार 103 धावांची खेळी केली आणि युझवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 40 धावा देत 5 विकेट मिळवल्या. याचा पाठलाग करताना केकेआरला 7विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सुरूवात केली होती. संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. मात्र केकेआरला यापैकी केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर 4 सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या