मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL नंतर श्रेयस अय्यरची आणखी एका मोठ्या स्पर्धेतून माघार

IPL नंतर श्रेयस अय्यरची आणखी एका मोठ्या स्पर्धेतून माघार

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार करण्यात आलं.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 19 जुलै : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार करण्यात आलं. आयपीएल सुरु व्हायच्या एक दिवस आधीच श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर आता त्याने सरावाला सुरुवात केली आहे, पण इंग्लंडमध्ये होणाऱ्या रॉयल लंडन कपमधून (Royal London Baby) श्रेयस अय्यरने माघार घेतली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये श्रेयस अय्यर उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. 'मी या मोसमात लँकशायरकडून (Lancshire) खेळू शकणार नाही. या क्लबला एक इतिहास आहे, या क्लबकडून भविष्यात खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे,' असं श्रेयस अय्यर म्हणाला. तसंच लँकशायर क्लबचे डायरेक्टर पॉल अलॉट यांनी श्रेयस अय्यर येणार नसल्यामुळे आम्ही निराश असल्याचं सांगितलं. श्रेयसचा फिटनेस त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. श्रेयस अय्यर लवकर फिट व्हावा यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. भविष्यात तो टीमसा भाग असेल, हा विश्वास आम्हाला आहे, असं पॉल म्हणाले. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात खेळण्यासाठी आपण फिट आहोत, असं श्रेयस अय्यर काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता. पण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असणार, याचा निर्णय टीमचे मालक घेतील, असं त्याने स्पष्ट केलं. अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीची टीम मागच्या मोसमात फायनलला पोहोचली होती. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनी दिल्लीचा पराभव केला. आयपीएलचा मोसम कोरोना व्हायरसमुळे 4 मे रोजी स्थगित करण्यात आला. तेव्हा दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. 26 वर्षांच्या श्रेयस अय्यरने 149 टी-20 मध्ये 2 शतकं आणि 25 अर्धशतकं केली. 32 च्या सरासरीने त्याने 3,975 रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अय्यरने 22 वनडेमध्ये 43 च्या सरासरीने 813 रन केले, यात 1 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 29 च्या सरासारीने 550 रन केले आहेत, यात त्याने 3 अर्धशतकंही केली.
First published:

Tags: Cricket, Delhi capitals, Ipl, Shreyas iyer

पुढील बातम्या