टीम इंडियाच्या जादुगरची जादू पाहिलीत का? BCCI ने शेअर केला VIDEO

बीसीसीआयने सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, आम्ही सर्वजण घरात आहे तर आमच्या घरातील जादुगर आपलं मनोरंजन करेल.

बीसीसीआयने सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, आम्ही सर्वजण घरात आहे तर आमच्या घरातील जादुगर आपलं मनोरंजन करेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन केलं जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातही याची भीती पसरली असून सर्व स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक खेळाडू घरातच त्यांचा वेळ घालवत आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय असून काही ना काही अपडेट करत असतात. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. अय्यरने पत्त्यांची जादू दाखवून चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. श्रेयस अय्यरचा हा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये श्रेयस त्याच्या बहिणीसोबत पत्त्यांनी खेळत असून जादू दाखवत असल्याचं दिसतं. व्हिडिओत अय्यर सुरुवातीला म्हणतो की, सध्यच्या परिस्थितीत स्वत:ला दूर ठेवण्याच्या स्थितीत मी बहिण नताशासोबत एक मॅजिक ट्रिक खेळत आहे. श्रेयस अनेक पत्ते घेऊन त्यातील एक पान बहिणीला काढायला सांगतो.  त्यानंतर न पाहता सर्व पत्ते नताशाकडे देतो आणि तिला हवं तसे पत्ते लपवायला सांगतो. त्यानंतरही श्रेयस अय्यर नताशाने काढलेलं ते पान शोधून काढतो जे त्यानं पाहिलेलं नसतं.
   
  View this post on Instagram
   

  The little things you do matters Thank you @shreyas41 for spreading joy when we are all indoors #TeamIndia

  A post shared by Team India (@indiancricketteam) on Mar 20, 2020 at 10:46pm PDT

  नताशा त्याची ही ट्रिक पाहून आश्चर्यचकीत होते. बीसीसीआयने सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, आम्ही सर्वजण घरात आहे तर आमच्या घरातील  जादुगर श्रेयस अय्यरवर विश्वास ठेवा तो आपलं मनोरंजन करेल. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी घराबाहेर न पडणं, गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. त्यामुळे अनेक गजबजलेली ठिकाणंही ओस पडल्यासारखी दिसू लागली आहेत. सगळीकडे शुकशुकाट पसरला आहे. हे वाचा : मेरी कोमने मोडला क्वारंटाईन प्रोटोकॉल, थेट पोहचली राष्ट्रपती भवनात
  First published: