Home /News /sport /

IPL 2021 : 'दिल्लीचा कर्णधार तू असणार का पंत?' श्रेयस अय्यरने दिलं उत्तर

IPL 2021 : 'दिल्लीचा कर्णधार तू असणार का पंत?' श्रेयस अय्यरने दिलं उत्तर

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा राऊंड सुरू व्हायला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे, पण त्याआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आनंदाची बातमी आहे. टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे फिट झाला आहे.

    मुंबई, 5 जुलै : आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा राऊंड सुरू व्हायला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे, पण त्याआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आनंदाची बातमी आहे. टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्णपणे फिट झाला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलचा पहिला राऊंड खेळता आला नव्हता, त्याच्याऐवजी ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं. श्रेयस अय्यरने द ग्रेट क्रिकेटर्स नावाच्या युट्यूब चॅनलवर आपल्या फिटनेस विषयी माहिती दिली. 'माझ्या खांद्याच्या उपचारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अंतिम टप्प्यात स्ट्रेन्थ आणि रेंज मिळवण्याचं काम सुरू आहे. यासाठी जवळपास एक महिन्यांचा वेळ लागेल. आयपीएलमध्ये मी खेळू शकेन, असं वाटत आहे,' असं अय्यर म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी ऋषभ पंतला दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं होतं. टीमने या मोसमात सुरुवातीच्या 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकल्या, त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. आता आयपीएलचा पुढचा राऊंड युएईमध्ये होणार आहे, तेव्हा दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल अय्यरला विचारण्यात आला, तेव्हा त्याने टीमचे मालक यावर निर्णय घेतील, असं उत्तर दिलं. 'टीम आधीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. सध्या टीम टॉपवर आहे. आमचं लक्ष्य ट्रॉफी जिंकणं आहे, कारण अजूनपर्यंत आम्हाला ती कधीच मिळाली नाही,' अशी प्रतिक्रिया त्याने दिली. अय्यरच्या नेतृत्वात मागच्या मोसमात दिल्ली फायनलमध्ये पोहोचली होती, पण मुंबईने त्यांचा पराभव केला होता. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली. या मोसमात 60 पैकी 29 सामने झाले आहेत, तर उरलेले 31 सामने युएईमध्ये होतील. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधीच आयपीएलचं आयोजन केलं जाईल. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात जागा मिळवण्याचा अय्यरचा प्रयत्न असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant, Shreyas iyer

    पुढील बातम्या