Home /News /sport /

Shreyas Iyer ने विकत घेतली नवीकोरी Mercedes SUV, किंमत ऐकून व्हाल शॉक!

Shreyas Iyer ने विकत घेतली नवीकोरी Mercedes SUV, किंमत ऐकून व्हाल शॉक!

टीम इंडियाचा खेळाडू आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शानदार मर्सिडिस- AMG 63 4 मॅटिक एसयूव्ही (Mercedes SUV) विकत घेतली आहे.

    मुंबई, 2 जून : टीम इंडियाचा खेळाडू आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शानदार मर्सिडिस- AMG 63 4 मॅटिक एसयूव्ही (Mercedes SUV) विकत घेतली आहे. अय्यरने विकत घेतलेल्या एसयूव्हीचे फोटो मुंबईच्या एका कार विक्रेत्याने शेअर केले आहेत. या गाडीची किंमत तब्बल 2.45 कोटी रुपये एवढी आहे. काय आहे गाडीची खासियत? मर्सिडिस-एएमजी 63 4 मॅटिक G-वॅगन सीरिजचं टॉप एडिशन आहे. तसंच हे 4.0 लीटर व्ही8 बीटुर्बो इंजिनद्वारे संचालित होतं. याचं आऊटपूट 430 किलोवॅट (585 HP) आणि पीक टॉर्क 850 एनएम असतं. मर्सिडिसची ही एसयूव्ही फक्त 4.5 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रती तासाचा वेग पकडते. साऊथ मुंबईच्या लक्झरी घरापेक्षाही महाग Rohit Sharma ची Car, IPL नंतर घरी जाताना दिसला फर्स्ट लूक, Video केकेआरची निराशाजनक कामगिरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केकेआरची आयपीएल 2022 मधली कामगिरी निराशाजनक झाली. टीमला प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नव्हता. लिलावामध्ये केकेआरने श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. या मोसमात अय्यरने 14 सामन्यांमध्ये 30.84 च्या सरासरीने 401 रन केले, यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर मागच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये होता. श्रेयस अय्यर 9 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सीरिजमध्ये मैदानात दिसेल. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजचा पहिला सामना दिल्लीमध्ये होणार आहे. यानंतर 12 जूनला कटक, 14 जूनला विशाखापट्टणम, 17 जूनला राजकोट आणि 19 जूनला बँगलोरमध्ये मॅच होतील. या सीरिजसाठी केएल राहुलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. IPL 2022 : बायो-बबलबाहेर येताच Ajinkya Rahane ने घेतली नवी कार, किंमत ऐकून बसेल धक्का!
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shreyas iyer

    पुढील बातम्या