कॉमनवेल्थमधून नेमबाजीला वगळल्याने भारताला मोठा धक्का!

कॉमनवेल्थमधून नेमबाजीला वगळल्याने भारताला मोठा धक्का!

गेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने नेमबाजीत सात सुवर्णपदकांसह 16 पदके जिंकली होती.

  • Share this:

बर्मिंगहम, 21 जून : कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. 2022 ला होणाऱ्या कॉमनवेल्थमधून नेमबाजीला वगळण्यात आलं आहे. भारतासाठी ही गोष्ट धक्कादायक आहे. गेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने नेमबाजीत सात सुवर्णपदकांसह 16 पदके जिंकली होती. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 2022 मध्ये महिला क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल, टेबल टेनिसचा समावेश करण्याला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, हे खेळ तेव्हाच सामिल केले जातील जेव्हा याला 51 टक्के सदस्यांची मान्यता मिळेल.

नेमबाजी कॉमनवेल्थमधून वगळण्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. गेल्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्ष रनिंदर सिंह यांनी 2022 च्या कॉमनवेल्थमधून नेमबाजी वगळल्यास भारताने स्पर्धेवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं आहेत. भारताने 1966 पासून प्रत्येक कॉमनवेल्थमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

कॉमनवेल्थ समितीच्या बैठकीत महिला क्रिकेटला मंजूरी मिळाली आहे. महिला क्रिकेटचा समावेश झाल्यास यात आठ संघ सहभागी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता या निर्णयाला सीजीएफच्या सदस्यांची मान्यता मिळणं बाकी आहे. आयसीसीने सांगितलं की, महिला क्रिकेटचा कॉमनवेल्थमध्ये समावेश व्हावा यासाठी आयसीसी आणि ईसीबीने खूप प्रयत्न केले आहेत.

कॉमनवेल्थमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. 1998 मध्ये मलेशियात झालेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं सुवर्ण पदक पटकावलं तर ऑस्ट्रेलियाने रौप्य आणि न्यूझीलंडने कांस्य पदक मिळवलं होतं.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

First published: June 21, 2019, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading