दंगलसारखा आणखी एक बापू! इलेक्ट्रिशिअनच्या मुलीनं मिळवलं ऑलिम्पिकचे तिकीट

दंगलसारखा आणखी एक बापू! इलेक्ट्रिशिअनच्या मुलीनं मिळवलं ऑलिम्पिकचे तिकीट

21 वर्षीय इलेक्ट्रिशिअनची मुलगी भारताला जिंकून देणार ऑलिम्पिक मेडल.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत करावी लागते. यात फक्त यशस्वी होणाऱ्या व्यक्तीचीच मेहनत नसते तर कुटुंबीयांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असते. यात क्रिडा जगतात वावरताना दबाव जास्त असतो. त्यातून मार्ग काढत देशाचा झेंडा अटकेपार रोवावा लागतो. अशीच एक यशस्वी कामगिरी भारताची नेमबाज चिंकी यादव हिनं केली आहे.

चिंकीनं आशियाई चॅम्पियनश स्पर्धेत 25 मी पिस्तुल गटात रजत पदक मिळवत ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री मिळवली आहे. 21 वर्षीय चिंकी ऑलिम्पिक कोट्यात जागा मिळवणारी 11वी भारतीय नेमबाज आहे. त्यामुळं भारताचा आणखी एक दावेदार आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी मेहनत करणार आहे.

शुक्रवारी झालेल्या या अंतिम सामन्यात चिंकीनं 298 गुण मिळवले. तर, या स्पर्धेत चिंकीनं एकूण 588 गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर होती. या स्पर्धेत 2 गुणांनी थायलॅंडच्या नाफास्वान यांगपाइबूनने सुवर्ण पदक जिंकले. चिंकीच्याआधी भारतीय नेमबाज राही सरनोबत हिनं ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली आहे.

चिंकीला ऑलिम्पिक कोट्यात जागा मिळवण्यासाठी अखंड प्रवास करावा लागला. हा प्रवास सोपा नव्हता. कोणत्याच आर्थिक मदतीशिवाय भारताचे नेमबाजीत प्रतिधित्व करणे सोपे नसते. मात्र एका इलेक्ट्रिशिअनच्या मुलीनं ही कामगिरी करून दाखवली. चिंकीचे वडिल मेहताब सिंह हे सरकारच्या खेळ विभागातच इलेक्ट्रिशिअन म्हणून काम करतात. भारताचे क्रिडा मंत्री किरण रिजीजू यांनीही चिंकीचे ट्विटरवर अभिनंदन केले.

कठिण परिस्थितीतून चिंकीनं काढला मार्ग

चिंकी ही मध्य प्रदेश खेळ विभागातच स्टेडियम जवळ राहायची. त्यामुळं लहानपणापासून चिंकी मैदानात नेमबाजीचा सराव करत असयाची. येथूनच चिंकीचे नेमबाजी प्रेम वाढले. त्यानंतर चिंकीनं मध्य प्रदेश अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळं परिस्थिती नसताना त्यावर मात करत चिंकीनं ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये चिंकी भारताला नक्कीच पदक मिळवून देईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

First published: November 8, 2019, 7:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या