मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

काय आहे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळणारं मानधन? सीनिअर खेळाडू करतायंत पगारवाढीची मागणी

काय आहे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळणारं मानधन? सीनिअर खेळाडू करतायंत पगारवाढीची मागणी

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असून भारतीय खेळाडूंना (Indian cricket players Salary) भरपूर मानधन देखील मिळते. तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Cricketers) त्यांना मिळणाऱ्या पगारावर नाराज आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 ऑगस्ट: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असून भारतीय खेळाडूंना (Indian cricket players Salary) भरपूर मानधन देखील मिळते. तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Cricketers) त्यांना मिळणाऱ्या पगारावर नाराज आहेत. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याच्यासह चार खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) पगार वाढवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानातील मीडिया रिपोर्टनुसार बाबर आझम, विकेटकीपर मोहम्मद रिझवान, ऑलराउंडर खेळाडू हसन अली (Hasan Ali) आणि वेगवान बॉलर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) या वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना मिळणारा पगार वाढवण्याची विनंती पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. पीसीबीने या चौघांसोबत करार करताना त्यांचा समावेश हा ‘ए’ ग्रेडमध्ये केला होता.

पाकिस्तान बोर्डाने 2021-2022 या वर्षासाठी खेळाडूंसोबत केलेल्या नवीन केंद्रीय करारांनुसार त्यांची कसोटी, वन डे आणि टी – 20 मॅचची फी वाढवण्यात आलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात 20 खेळाडूंसोबत त्यांच्या कामगिरीच्या आधारावर केंद्रीय करार केले होते. यामध्ये सर्व प्रकारच्या मॅचेससाठी मॅच फी ही समान ठेवण्यात आली आहे. यामुळे हे खेळाडू नाराज आहेत. तसं खेळाडूंनी नाराज होणं अपरिहार्य आहे. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंना इतका कमी पगार मिळतो की, जे जाणून तुम्ही चकित व्हाल. विविध ग्रेडनुसार भारतीय खेळाडूंना मिळणारा पगार आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळणारा पगार पाहिला, तर यामध्ये खूपच तफावत आहे.

हे वाचा-IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग

भारतीय खेळाडूंच्या तुलनेत विचार केल्यास पाकिस्तानी खेळाडूंना एवढा कमी पगार मिळतो, की जे जाणून आर्श्चय वाटेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारात तीन श्रेणी आहेत. यापैकी पहिल्या श्रेणीतील अर्थात ग्रेड ए मधील खेळाडूंना वर्षाला फक्त 46 लाख रुपये मिळतात. तर ग्रेड बी खेळाडूंना 28 लाख आणि ग्रेड सी खेळाडूंना फक्त 19 लाख वर्षाला मिळतात.

हे वाचा-IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंचा पगार बघितला तर तो शेजारील देशातील क्रिकेटपटूपेक्षा खूपच जास्त आहे. भारताच्या ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड बी खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंसाठी 1 कोटी रुपये वर्षाला पगार दिला जातो. ग्रेड सी मधील भारतीय खेळाडूला जेवढा पगार दिला जातोय, तेवढा पगार पाकिस्तानच्या ए ग्रेड मधील खेळाडूला सुद्धा नाही. त्यामुळे तुलना केली तर पाकिस्तानी खेळाडूंची नाराजी योग्य वाटते.

First published:

Tags: BCCI, Pakistan Cricket Board