'जगातले सर्व कर्णधार मठ्ठ, विराट तेवढा शहाणा'; शोएबच्या VIDEOने क्रिकेट विश्वात खळबळ

'जगातले सर्व कर्णधार मठ्ठ, विराट तेवढा शहाणा'; शोएबच्या VIDEOने क्रिकेट विश्वात खळबळ

शोएब अख्तरच्या नव्या युट्युब व्हिडीओमध्ये त्यानं पुन्हा एकदा पाक कर्णधारावर टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका 2-0नं आपल्या खिशात घातली. पुण्यात झालेल्या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत विजय मिळवला. यात विराट कोहलीनं पहिल्या डावात 257 धावांची विक्रमी खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीचे सर्वच स्थरांवर कौतुक होत आहे. यात विराटनं कसोटीमध्ये सातवे कसोटी शतक केले. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरनं विराटचे कौतुक केले आहे.

शोएब अख्तरनं आपल्या यू-ट्युब चॅनलवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात विराटनं विक्रमी कामगिरी केली. यानंतर शोएबनं विराट हा जगातला नंबर एकचा कर्णधार आहे, असे मत व्यक्त केले. याशिवाय शोएबनं भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांचेही कौतुक केले आहे.

शोएबनं आपल्या व्हिडीओमध्ये, "मी जगभरातील कर्णधार पाहिले आहे. सगळेच्या सगळे मठ्ठं आहेत. विराट हा फक्त एकमेव सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे", असे सांगत. यादरम्यान त्यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसचेही कौतुक केले. पण सरफराज डोकं फिरलेला कर्णधार आहे, असे म्हणत अख्तरनं ट्रोल त्याल ट्रोल केले.

वाचा-ICCने क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात केला बदल; आता होणार नाही अन्याय!

सफराजची पुन्हा उडवली खिल्ली

वर्ल्ड कप दरम्यान शोएबनं सरफराज बेअक्कल असल्याचे मत व्यक्त केले होते. आता शोएबनं पुन्हा एकदा सरफराजवर टीका केली आहे. शोएबनं सरफराजला बिनडोक म्हणत, डोकं फिरलेला कर्णधार अशी मस्करी केली आहे. त्याचबरोबर "चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला काय झालं माहित नाही", असेही शोएब म्हणाला.

वाचा-‘अब अंडरग्राऊंड होने का समय है’! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांचा धुमाकूळ

विराट कोहलीचे केले कौतुक

शोएबनं आपल्या व्हिडीओमध्ये, "वर्ल्ड कपनंतर विराटनं आपल्या कर्णधारीमध्ये सुधारणा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये झालेल्या चुकांमधून तो खुप शिकत आहे. त्याला माहित आहे की, कोणत्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे आणि कोणत्या खेळाडूंना नाही. त्यानं बॅटिंग ऑर्डरवर काम केले आहे", असे मत व्यक्त केले.

कसोटी रॅकिंगमध्ये विराटची पहिल्या क्रमांकासाठी आगेकुच

पुण्यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ताजी टेस्ट रॅकिंग जाहीर केली. या कसोटी रॅकिंगमध्ये विराटनं आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळं आता विराटला पहिले स्थान मिळवण्यासाठी दोन गुणांची गरज आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात दुहेरी शतक करत विराटनं 37 गुण मिळवले. दक्षिण आफ्रिका विरोधात विराटनं नाबाद 245 धावांची खेळी केली होती. त्यामुळं विराट पुन्हा 900 गुणांनी वरच्या स्थानी पोहचला आहे. दरम्यान पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या खात्यात 937 अंक आहेत. तर विराट कोहली 936 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळं भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटकडे स्मिथला धोबीपछाड देण्याची संधी असणार आहे.

वाचा-खेळाडूंचा पासिंग द पार्सल! क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात विचित्र कॅच, पाहा VIDEO

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या