• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर', Mohammed Shami ला रावळपिंडी एक्सप्रेसचा कानमंत्र

'तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर', Mohammed Shami ला रावळपिंडी एक्सप्रेसचा कानमंत्र

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यापूर्वी, रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने शमीला (Shoaib Akhtar) कानमंत्र दिला आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत आहे. यापूर्वी, पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभवाचा (IND vs PAK) सामना करावा लागला. यानंतर सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami ) ट्रोल करण्यात आले. शमीवर निशाणा साधल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्व दिग्गजांनी त्याला पाठिंबा दिला. आता, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने शमीला (Shoaib Akhtar) कानमंत्र दिला आहे. इंडिया डॉट कॉमशी केलेल्या खास संवादात अख्तरला जेव्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून शमीला वगळण्यात यावे का असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी द्या. जेव्हा लोक तुमच्यावर टीका करतात तेव्हा तुम्ही बॉल पकडता आणि मैदानात उतरता आणि कामगिरी करता, विकेट घेता. तुम्ही या दिवसासाठी तयार आहात. मी शमीला मैदानावर जाऊन विकेट घेण्याचा सल्ला देईन, चांगला वॉर्म अप करा आणि जा विकेट घ्या. लोक काय म्हणत आहेत याचा विचार करू नका. असा कानमंत्र अख्तरने शमीला दिला आहे. यापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने, ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. खूप लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप खालच्या पातळीचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, म्हणून हा ड्रामा केला जातो. खेळाडूचं समर्थन कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरच्या आवाजांचं आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही,' असं विराट कोहली म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 151 रन केले. विराट कोहलीच्या अर्धशतकाशिवाय इतर खेळाडू अपयशी ठरले. पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्येच हे आव्हान पार केलं. मोहम्मद शमीने या सामन्यात 3.5 ओव्हरमध्ये 43 रन दिले. मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: