• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20WC: भारताविरुद्ध एकच सामना का खेळायचा? रावळपिंडी एक्सप्रेसचा सवाल

T20WC: भारताविरुद्ध एकच सामना का खेळायचा? रावळपिंडी एक्सप्रेसचा सवाल

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

न्यूझीलंडचा (NZ vs AFG) पराभव व्हावा आणि फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Final)यांच्यात लढत व्हावी पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने व्यक्त केली इच्छा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची मॅच आता सुरू झाली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने (Shoaib Akhtar )न्यूझीलंडचा पराभव व्हावा आणि फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत(IND vs PAK) व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचणारे तीन संघ निश्‍चित झाले असून त्यात पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर सध्या एका जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान असे 3 संघ आहेत. यापैकी न्यूझीलंड संघ बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. दरम्यान अख्तरने टीम इंडियाच्या सेमीफानल प्रवेशावर भाष्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान सुपर-12 टप्प्यात आमनेसामने आले, तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेली टीम इंडियाची विजयी घोडदौड पाकिस्तानला रोखण्यात पहिल्यांदाच यश आले. अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेल्या आपले मत व्यक्त केले. 'अनेकजण म्हणत आहेत की, न्यूझीलंडने अफगाणिस्तावर विजय मिळवत टीम इंडियाला सेमीफायनल स्पर्धेतून बाहेर करावे. पण माझी इच्छा नाही. मी न्यूझीलंडचे समर्थन करणार नाही. कारण मी फक्त आशा करू शकतो की पाकिस्तान (ग्रुप 2) गुणतालिकेत अव्वल असेल. बाकीच्या निकालांची काळजी करू नये. असे त्याने यावेळी सांगितले. तसेच तो पुढे म्हणाला, भारताविरुद्ध एकच सामना का खेळायचा? फायनल का खेळू नये? आणि अंतिम होण शक्य आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळला तर ते क्रिकेटसाठीही चांगले होईल. यामुळे वर्ल्ड कप आणखी मोठा होणार असे मत अख्तरने यावेळी व्यक्त केले. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना या स्पर्धेतील भारताचे भवितव्य ठरवेल. किवीच्या विजयामुळे भारताच्या संधी संपुष्टात येतील तर अफगाणिस्तानचा विजय त्यांना शर्यतीत ठेवेल. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने जिंकल्यास पात्र ठरण्यासाठी भारताला त्यांच्या अंतिम साखळी टप्प्यातील सामन्यात नामिबियाला ठराविक फरकाने पराभूत करावे लागेल.
  Published by:Dhanshri Otari
  First published: