भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होती.
मुंबई, 10 जानेवारी : भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) आग लागल्यामुळे नुकतेच जन्माला आलेले 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण देश तर हादरलाच पण सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्ताननेही (Pakistan) या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) या घटनेमुळे हळहळला.
शोयब अख्तरने भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेबद्दल ट्वीट करून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता नवजात शिशू केअर यूनिटला आग लागून 10 बाळांचा मृत्यू झाला. ही घटना खूपच धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे. या घटनेबद्दल डॉक्टरांनी सांगितले. खूपच वाईट बातमी आहे ही' अशा शब्दांत शोयब अख्तरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Very very sad news 😭😭newborn babies died after fire broke out in the Special Newborn Care Unit of a hospital in Maharashtra in the early hours of Saturday, doctors said
एरव्ही भारताबद्दल वाटेल ते बोलणारा शोयब भंडाऱ्याच्या घटनेनं हादरून गेला. त्यांच्या या ट्वीटनंतर पाकिस्तानमधील ट्वीटर युझर्सनीही भंडाऱ्यातील घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
गुदमरुन 10 बाळांचा मृत्यू
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.
त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बाळ वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.