‘केवळ गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

‘केवळ गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

भारताची माजी कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (BCCI President) निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : भारताची माजी कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (BCCI President) निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आजही गांगुलीचा तेवढाच दबदबा आहे. त्यामुळं त्याच्या या नव्या वाटचालीसाठी सर्वच आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात आता पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनं बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गांगुलीची निवड झाल्याचे समर्थन करत, त्याचे अभिनंदन केले.

दरम्यान, शोएब अख्तर आयपीएलच्या पहिल्या हंगामात गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामुळं गांगुलीकडे खेळाडूंची मानसिकत बदलणे आणि त्याचबरोबर संघात योग्य खेळाडूंना संधी देणे त्याला माहित असल्याचे मत अख्तरनं व्यक्त केले.

शोएब अख्तर सोशल मीडियावर तत्पर असून आपल्या युट्युब चॅनलवर रोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करत असतो. नुकतेच अख्तरनं अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये गांगुलीचे कौतुक केले आहे. शोएबनं, “मला वाटतं भारतात कोणीतरी क्रिकेट या खेळाला बदलण्यासाठी आला होता, त्याचे नाव होते सौरव गांगुली. 1997-98मध्ये मला कधीच वाटले नव्हते की भारत पाकिस्तानला हरवेल. मला असे वाटत होते की भारताकडे अशी पध्दत नाही आहे जी पाकला नमवेल पण सौरवनं भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली”, असे सांगत गांगुलीचे कौतुक केले. तसेच, “सौरव गांगुली एक महान नेतृत्व आहे. तो इमानदार तर आहेच पण त्याच्याकडे योग्य क्षमता असलेले खेळाडू निवडण्याची समज आहे”, असेही शोएब आपल्या व्हिडीओत म्हणाला.

वाचा-BCCIचा अध्यक्ष होण्याआधीच गांगुलीला बसला 7 कोटींचा फटका!

10 महिन्यासांठी झाली निवड

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोधात निवड झाली आहे. 23 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या निवडणुकीत सर्व सदस्य आपला पदभार स्विकारतील. मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. याचबरोबर जय शहा आणि अरुण सिह धुमल यांचीही 10 महिन्यांसाठी निवड झाली आहे.

वाचा-‘अब अंडरग्राऊंड होने का समय है’! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांचा धुमाकूळ

आजही भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीची दादागिरी

सौरव गांगुलीने फलंदाजीत तर विक्रम केलेच पण कर्णधार म्हणून त्यानं जगभरात नाव कमावलं. भारतीय संघाच्या पडत्या काळात गांगुलीने नेतृत्व केलं आणि संघाला पुन्हा उभा केलं. खेळाडूंना प्रोत्साहन देताना नेहमीच त्यांना पाठिंबा दिला. गांगुलीने टाकलेला विश्वास खेळाडूंनीही सार्थ ठरवला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघात आत्मविश्वास निर्माण झाला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले. यामध्ये युवराज सिंग, जहीर खान, महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचा समावेश आहे. यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाली. याशिवाय अजित आगरकर, आशिष नेहराने गांगुलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली.

वाचा-अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 16, 2019, 1:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading