World Cup : असा अनफिट कर्णधार पाहिला नाही...शोएब अख्तरनं घेतली पाकिस्तानच्या खेळाडूंची शाळा

World Cup : असा अनफिट कर्णधार पाहिला नाही...शोएब अख्तरनं घेतली पाकिस्तानच्या खेळाडूंची शाळा

पाकिस्तानच्या संघाविरोधात शोएब अख्तरनं केलेल्या जबर टीकेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

लंडन, 02 मे : पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिध्द असलेला शोएब अख्तरनं पाकिस्तान संघाची शाळा घेतली आहे. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. त्यामुळंच शोएब अख्तरनं पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज याच्यावरच टीक केली आहे.

वेस्ट इंडिजनं अगदी सहजरित्या 7 विकेटनं पाकिस्तानला पराभूत केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघानं आतापर्यंत 11 सामन्यात पराभव पत्करला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेला पाकिस्तान संघ 105 धावाच करु शकला. याआधी 1992मध्ये इंग्लंडविरोधात पाकिस्तानचा संघ 74 धावांवर बाद झाला होता. दरम्यान वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळं पाकिस्तानच्या संघावर टीका केली जात आहे.

या सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजीवर शोएब अख्तरनं चांगलीच शाळा घेतली. शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शोएबनं पाकिस्तानच्या फलंदाजांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अख्तरनं, एवढं मोठ पोट एवढं मोठं तोंड. असा पहिला पाकिस्तानी कर्णधार असावा जो एवढा अनफिट आहे, अशी टीका केली. दरम्यान अख्तरनं सामन्यादरम्यान खेळाडूंच्या वृत्तीवरही टीका केली. तर, जलद गोलंदाज मोहम्मद आमिर याचे कौतुक केले. पाकिस्तान संघाच्या या पराभवामुळं त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात होती.

दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ कोणत्याही संघाला धक्का देऊ शकतात. पाकिस्तानसाठी मागच्या दोन मालिका जरी चांगल्या राहिल्या नसल्या तरी त्यांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अनुभव वर्ल्ड कपदरम्यान पथ्यावर पडू शकतो. 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारताला पराभूत करणारा पाकिस्तानचा संघ सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली उतरला आहे. वर्ल्ड कपच्या आधी त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहेत . फलंदाजी आणि गोलंदाजीत जरी संघ ठीक असला तरी क्षेत्ररक्षणात त्यांची कामगिरी सुमार आहे.

वाचा-पाकिस्तानच्या खेळाडूची टर उडवणाऱ्यांना सानिया मिर्झाने दिलं उत्तर

वाचा- World Cup : पराभवानंतरही पाकिस्तान खूश! हा योगायोग 'लकी' ठरणार?

वाचा- पाकच्या पराभवानंतर 'असा' जल्लोष, अफगाणिस्तानामध्ये गोळीबाराचा VIDEO व्हायरल

VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला

First published: June 2, 2019, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading