Home /News /sport /

...त्या दोन महिलांनी बदनाम केलं, शोएब अख्तरने सांगितलं दु:ख

...त्या दोन महिलांनी बदनाम केलं, शोएब अख्तरने सांगितलं दु:ख

शोएब अख्तरने सांगितलं दु:ख

शोएब अख्तरने सांगितलं दु:ख

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) स्टार बनण्याच्या आधी आयुष्यात खूप संघर्ष केला. रावळपिंडीच्या एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या शोएब अख्तरने खूप मेहनत केली आणि क्रिकेटमध्ये नाव कमावलं.

    मुंबई, 27 ऑगस्ट : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) स्टार बनण्याच्या आधी आयुष्यात खूप संघर्ष केला. रावळपिंडीच्या एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या शोएब अख्तरने खूप मेहनत केली आणि क्रिकेटमध्ये नाव कमावलं. शोएब अख्तरच्या नावावर क्रिकेट इतिहासातला सगळ्या फास्ट बॉल टाकण्याचा विक्रमही आहे. पाकिस्तानसाठी शोएबने टेस्टमध्ये 178 आणि वनडेमध्ये 247 विकेट घेतल्या. सचिन तेंडुलकर, रिकी पॉण्टिंग आणि मॅथ्यू हेडन यांच्यासारख्या बॅट्समननाही शोएबने अडचणीत आणलं, पण अख्तरला मोठा क्रिकेटपटू होण्याआधी अनेकांनी त्रास दिला. शोएब अख्तरने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. 'मोहल्ल्यामधल्या दोन बायका कायमच मला बदनाम करायच्या. त्यांचे टोमणे ऐकल्यामुळेच आपण मोठे क्रिकेटपटू झालो. माझ्या करियरच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. मी रावळपिंडीमध्ये ट्रायल देत होते. मी खूप जास्त आक्रमक होतो. लोक माझ्या टॅलेंटवर प्रश्न उपस्थित करायचे,' असं शोएब म्हणाला. 'मोहल्ल्यातल्या दोन बायका कायमच माझ्यावर निशाणा साधायच्या. कुठे जात आहेस, असं त्या मला सारखं विचारायच्या. स्टार बनायला जातोय, असं उत्तर मी त्यांना द्यायचो. यानंतर त्या माझी बदनामी करायच्या. तुझं काहीच होऊ शकत नाही, असे टोमणे मला मारायच्या. थोडे दिवस थांबा, मी पाकिस्तानचा पुढचा स्टार आहे, असं मी त्यांना सांगायचो,' असं शोएब अख्तरने सांगितलं. शोएब अख्तरची मेहनत कामाला आली. 1997 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. करियरच्या सुरुवातीला शोएबने संघर्ष केला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने नाव कमावलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan, Shoaib akhtar

    पुढील बातम्या