• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • शोएब अख्तर आपल्याच खेळाडूंना म्हणाला 'भगोडा', तालिबानशी केली तुलना

शोएब अख्तर आपल्याच खेळाडूंना म्हणाला 'भगोडा', तालिबानशी केली तुलना

टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) टीम निवडल्यानंतर पुढच्या दोन तासांमध्येच पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) खळबळ उडाली.

 • Share this:
  लाहोर, 7 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) टीम निवडल्यानंतर पुढच्या दोन तासांमध्येच पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) खळबळ उडाली. टीमचा हेड कोट मिसबाह उल हक (Misbah Ul Haq) आणि बॉलिंग कोच वकार युनूस (Waqar Younis) यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. टी-20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला खेळणार आहे. या दोन्ही कोचनी वर्ल्ड कपआधी राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच भडकला आहे. शोएब अख्तरने या दोघांच्या पळून जाण्याची तुलना तालिबान आणि अमेरिकेशी केली आहे. जियो टीव्हीसोबत बोलताना अख्तर म्हणाला, 'मला वाटतं इकडे तालिबानने अमेरिकन सैन्यासोबत केलं तेच झालं. रमीझ राजा आपल्याला सोडणार नाही, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मैदान सोडून पळण्याचा निर्णय घेतला.' रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे, यानंतर दोघांनी राजीनामा दिला. 'या दोघांनी आपल्या निर्णयाची स्वत: घोषणा करण्याऐवजी पीसीबच्या निर्णयाची वाट पाहणं गरजेचं होतं. हा निर्णय खूप खराब होता. कारण टी-20 वर्ल्ड कपच्या आधी हे करण्यात आलं. दोन्ही कोचना आपला बुरखा फाटेल याची भीती होती,' अशी टीका शोएबने केली.
  'तो चांगला माणूस असेल किंवा खराब, तो जगातला सर्वोत्तम बॉलरही असेल, पण अखेर त्याचा पर्दाफाश होईल. या दोघांनी पळून जाऊनच स्वत:ला एक्सपोज केलं. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या दोघांना बरखास्त करायचं होतं त्यांनी केलं पाहिजे होतं. वर्ल्ड कपसाठी तुम्ही 100 टक्के प्रयत्न केले पाहिजे होते, त्यानंतर राजीनामा द्यायला पाहिजे, पण डरपोक पळून जाण्याशिवाय काय करतात?' असा सवाल शोएबने विचारला. राजीनामा देताना मिसबाह उल हकने बायो-बबल आणि पाकिस्तान क्रिकेट टीमच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचं कारण दिलं. तर वकारनेही मग मिसबाहच्या पावलावर पाऊल ठेवलं.
  Published by:Shreyas
  First published: