पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत शोएब अख्तरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत शोएब अख्तरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

'अतिशय गुणवान असलेले खेळाडू जेव्हा थोड्या पैशांसाठी स्वत:ला विकतात तेव्हा अतिशय वाईट वाटते.'

  • Share this:

इस्लामाबाद 2 नोव्हेंबर : रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेट संघाबाबात सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. या गौप्यस्फोटाने पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात खळबळ उडालीय.  शोएबने आपल्याच माजी सहकाऱ्यांवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मी आमच्याच क्रिकेट संघात फिक्स करणाऱ्या भ्रष्ट लोकांनी घेरलो होते असंही त्याने  'रिवाइंड विथ समीना पीरजादा' या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. शोएबने यावेळी अनेक खुलासेही केले आहेत.शोएब म्हणाला, मला 21 खेळाडूंविरुद्ध खेळावं लागत असे. 11 खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघाचे तर 10 खेळाडू हे माझ्याच स्वत:च्या संघातले होते. कधी आणि कोण फिक्सर्सला सामील असतील याचा काहीच नेम नव्हता. पाकिस्तानचे फास्ट बॉलर्स मोहम्मद अमीर आणि मोहम्मद असिफ हे स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमध्ये इंग्लंडमध्ये सापडले होते आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती याची आठवणही त्याने सांगितली.

हरमनप्रीतचा 'सुपरकॅच' पाहून तुम्हीही म्हणाल, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

तो पुढे म्हणाला, सट्टेबाज हे सर्वच खेळाडूंना संपर्क करत होते. त्यामुळे कोण फिक्स आहे आणि कोण नाही हे कधीच कळत नव्हतं. मात्र मी अशा प्रयत्नांना कधीच थारा दिला नाही. पाकिस्तानचे अनेक सामने हे फिक्स असायचे. मी मात्र माझ्या देशाला कधीही धोका दिला नाही. या सगळ्या गोष्टींचा मला राग यायचा मात्र मी काहीच करू शकलो नाही अशी कबुलीही त्याने दिली.

गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

आमच्या संघातल्या काही लोकांनी मला या गोरखधंद्याची माहिती दिली होती. खेळाडूंना कसे फिक्स केले जातात आणि कसे पैसे दिले जातात याची माहिती त्यांनी मला दिली.  हे सगळं ऐकल्यानंतर मला धक्का बसला असंही त्याने सांगितलं. अतिशय गुणवान असलेले खेळाडू जेव्हा थोड्या पैशांसाठी स्वत:ला विकतात तेव्हा अतिशय वाईट वाटते असंही तो म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या