मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अख्तर-जयसूर्या पुन्हा उतरणार मैदानात; कधी? अन् कोणत्या? टीमकडून खेळणार, घ्या जाणून

अख्तर-जयसूर्या पुन्हा उतरणार मैदानात; कधी? अन् कोणत्या? टीमकडून खेळणार, घ्या जाणून

Shoaib Akhtar and sanath jayasuriya

Shoaib Akhtar and sanath jayasuriya

पाकिस्तान संघाचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि महान फलंदाजांपैकी एक असलेले सनथ जयसूर्या(Sanath Jayasuriya) पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: पाकिस्तान संघाचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि महान फलंदाजांपैकी एक असलेले सनथ जयसूर्या(Sanath Jayasuriya) पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत. लीजेंड्स क्रिकेट लीग,(Legends Cricket League) निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची व्यावसायिक क्रिकेट लीग, गुरुवारी जाहीर केली. शोएब अख्तर आणि सनथ जयसूर्या हे खेळाडू पुढील महिन्यात सुरुवातीच्या टप्प्यात आशिया लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करतील.

ओमानमधील अल अमिराती क्रिकेट स्टेडियमवर तीन संघांमध्ये ही लीग खेळवली जाणार आहे. आशिया लायन्स व्यतिरिक्त इतर दोन संघ भारत आणि उर्वरित संघ असतील. आशिया लायन्समध्ये अख्तर, शाहिद आफ्रिदी, जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कलुवितरण आणि तिलकरत्ने दिलशान सारखे खेळाडू आहेत. त्यांच्याशिवाय अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल, युनूस खान आणि असगर अफगाण यांचाही या संघात समावेश आहे.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त आहेत. ते म्हणाले, 'हे अव्वल दर्जाचे क्रिकेट रोमांचक असेल. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील आशियाई दिग्गज अशा संघात एकत्र आहेत. जे निश्चितपणे इतर दोन संघांना कडवी टक्कर देईल.

First published:

Tags: Cricket news