मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शोएबचा तो सल्ला मस्करीत घेणं हार्दिकला पडलं महाग, अन्यथा झाली नसती दुखापत!

शोएबचा तो सल्ला मस्करीत घेणं हार्दिकला पडलं महाग, अन्यथा झाली नसती दुखापत!

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा भारताची फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची समस्या संपली असं वाटत होतं. पण 2018 साली त्याला पाठीची दुखापत झाली तेव्हापासूनच तो टीम इंडियातून आत-बाहेर होत आहे. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही हार्दिक पांड्याला इशारा दिला होता.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 डिसेंबर : 2016 साली हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा भारताची फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची समस्या संपली असं वाटत होतं. बडोद्याच्या या खेळाडूने आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केलं, पण 2018 साली त्याला पाठीची दुखापत झाली तेव्हापासूनच तो टीम इंडियातून आत-बाहेर होत आहे. दुखापतीमुळे हार्दिकची बॉलिंगही बर्बाद झाली. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही हार्दिक पांड्याला इशारा दिला होता.

2019 वर्ल्ड कपनंतर हार्दिकची कामगिरी कमालीची घसरली. एवढच नाही तर भारत जेव्हा टी-20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup-2021) बाहेर झाला तेव्हा हार्दिकवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. दुबळं शरीर आणि कमकुवत पाठीमुळे हार्दिकला खूप अडचणींचा सामना करावा लागल्याचं शोएबने सांगितलं. हार्दिकला आपण दुखापतीची पूर्वसूचना दिली असल्याचं शोएब म्हणाला.

'2018 आशिया कपदरम्यान मी हार्दिकशी बोललो होतो, तेव्हा मी त्याला पाठ मजबूत करण्याचा सल्ला दिला होता. मी दुबईमध्ये बुमराह आणि हार्दिकलाही सांगितलं होतं. ते एखाद्या पक्षासारखे दुबळे आणि लुकडे होते. त्यांच्या पाठीच्या मांसपेशी मजबूत नव्हत्या. माझ्या खांद्याच्या मागे एवढ्या मजबूत मांसपेशी आहेत, तुम्ही पाहू शकता,' असं शोएब आकाश चोप्राच्या युट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाला.

'मी हार्दिकच्य पाठीला हात लावला, त्याच्या मांसपेशी कमकुवत होत्या, तेव्हा मी त्याला इशारा दिला होता की तुला दुखापत होऊ शकते, पण मी खूप क्रिकेट खेळतो, असं उत्तर त्याने मला दिलं. बरोबर दीड तासाने हार्दिक माझ्याजवळ आला तेव्हा त्याला दुखापत झाली होती,' असं वक्तव्य शोएबने केलं. 2018 साली आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप-स्टेज सामन्यात हार्दिकला बॉलिंग करत असताना दुखापत झाली. तेव्हापासून हार्दिकचं करियर पाठीच्या दुखण्यामुळे प्रभावित झालं.

टी-20 वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही तो खेळला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हार्दिकने निवड समितीला काही काळ आपला विचार करू नका, कारण आपल्याला फिट व्हायचं आहे, असं सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, Shoaib akhtar, Team india