चाहत्यांच्या संतापानंतर अख्तरची बिनशर्त माघार, म्हणाला...

चाहत्यांच्या संतापानंतर अख्तरची बिनशर्त माघार, म्हणाला...

शोएबनं भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर ट्विटवरुन संताप व्यक्त केला होता. मात्र आता या विषयावर तो मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

  • Share this:

कराची, 20 ऑगस्ट : भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या पचनी पडला नाही. भारताच्या निर्णयानं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेशांत विभागलं आहे. यामुळं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान ते तिथले क्रिकेटपटू सर्वांनीच यावर प्रतिक्रिया दिली. मात्र आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपले सूर बदलले आहेत. आधी शोएबनं भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर ट्विटवरुन संताप व्यक्त केला होता. मात्र आता या विषयावर तो मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर भारतावर टीका करणाऱ्या शोएबनं काश्मीरच्या विषयावर यु-टर्न घेतला आहे. अख्तरने आपल्या युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करत काश्मीर विषयावर वातावरण भडकावणारे वक्तव्ये करु नका असे चाहत्यांना सांगितले आहे. याआधी काश्मीरबद्दल टीका केल्यानं भारतीय चाहत्यांनी अख्तरचे युट्यूब चॅनेल अनसबस्क्राइब करण्याची मोहिम सुरु केली होती. त्यानंतर अख्तरला हे शहाणपण आल्याची चर्चा सुरु आहे.

अख्तरने युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, “मला माहित आहे की परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. तसेच, मला हे सुध्दा मान्य आहे की, तुमच्या देशावर तुमचं भरपूर प्रेम आहे. म्हणून उगाच आणखीन तणावपूर्ण होईल असे कोणतेही विधान काश्मीरसंदर्भात आपल्याकडून होता कामा नये याची मी काळजी घेऊन आणि चाहत्यांनाही आवाहन करेन,” असे अख्तरने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या अख्तरचे युट्यूब चॅनेलवर 15 लाख 31 हजार सबस्क्रायबर आहेत.

वाचा-‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

जावेद मियांदादची मुक्ताफळे

अख्तरनंतर पाकिस्तानी माजी खेळाडू जावेद मियांदाद यांनी भारताला धमकी देणारे विधान केले होते. पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले आहे.

वाचा-शोएब मलीकनंतर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू आज होणार भारताचा जावई!

पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान

जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन करणारा खेळाडू आता सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

Published by: Akshay Shitole
First published: August 20, 2019, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading