मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मृत्यूच्या दाढेतून वाचवलं तीच जग सोडून गेली', आईच्या मृत्यूमुळे शोएब इमोशनल!

'मृत्यूच्या दाढेतून वाचवलं तीच जग सोडून गेली', आईच्या मृत्यूमुळे शोएब इमोशनल!

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar mother death) आईचं निधन झालं आहे. शोएब अख्तरने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar mother death) आईचं निधन झालं आहे. शोएब अख्तरने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar mother death) आईचं निधन झालं आहे. शोएब अख्तरने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar mother death) आईचं निधन झालं आहे. शोएब अख्तरने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. माझी आई, माझ्यासाठी सगळं होती, ती अल्लाहच्या मर्जीने आम्हाला सोडून जन्नतमध्ये गेली, असं शोएब अख्तर त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे. यानंतर हरभजनने (Harbhajan Singh) लगेचच शोएब अख्तरचं सांत्वन केलं आहे. तुझ्या या कठीण काळात माझी संवेदना तुझ्यासोबत आहे. ती आता शांततेत आराम करू शकते. मजबूत राहा माझ्या भावा, असं हरभजन म्हणाला आहे. शोएब अख्तरची आई मागच्या काही दिवसांपासून आजारी होती. काहीच दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक नवसांनंतर शोएबचा जन्म शोएब अख्तरचा जन्म अनेक नवसांनंतर झाला. शोएबच्या आईने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं. स्वत: शोएबने त्याच्या बायोग्राफीमध्ये यावर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी शोएबने सोशल मीडियावर त्याच्या गुडघ्याच्या एक्स-रेचा फोटो शेयर केला होता. एक मुलगा 6 वर्षांपर्यंत ठीक चालूही शकत नव्हता, तो पुढे जाऊन क्रिकेट इतिहासातला सगळ्यात जलद बॉलर बनला, त्यामुळे स्वप्न बघणं सोडू नका, असं शोएब म्हणाला. आपलं आत्मचरित्र कॉन्ट्रोव्हर्शियली यूवर्समध्ये  (Controversially Yours) शोएबने त्याच्या लहानपणीचा कठीण काळ सांगितला आहे. लहाणपणी आपले पायाचे तळवे सपाट होते, त्यामुळे मला चालणं तर सोडा नीट उभंही राहता यायचं नाही. 6 वर्ष मला हा त्रास झाला, असं शोएबने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. तीन वर्षांचा असताना शोएबला काळा खोकला नावाचा आजार झाला. अनेकांना तर शोएब आता जगणार नाही असं वाटलं. डॉक्टरांनीही शोएबची फुफ्फुस कायमची कमकुवत झाल्याचं सांगितलं. या आजारामुळे शोएबच्या फुफ्फुसांचा आकार वाढला. अनेक उपचार करूनही शोएब बरा होत नव्हता. शोएबच्या उपचारांवर पैसे खर्च न करण्याचा सल्ला त्याच्या आजोबांनी आईला दिला, पण तरीही आईने हार मानली नाही आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. शोएब अख्तर त्याच्या आई-वडिलांचं पाचवं अपत्य आहे, त्याच्यापेक्षा मोठा चौथ्या क्रमांकाच्या भावाचं नावही शोएब होतं, पण वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याचं आजारपणामुळे निधन झालं. शोएबच्या आईला हे नाव खूप आवडायचं, त्यामुळे त्यांनी पाचव्या मुलाचं नावही शोएब ठेवलं. शोएब जगातला सगळ्यात जलदगती बॉलर मानला जातो. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएबने 2002 साली न्यूझीलंडविरुद्ध सगळ्यात जलद 161 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला होता. शोएबने 224 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, यात 46 टेस्ट, 163 वनडे आणि 15 टी-20 मॅचचा समावेश आहे. यात त्याने 178 टेस्ट, 247 वनडे आणि 19 टी-20 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये तो केकेआरकडूनही खेळला आहे. 36 व्या वर्षी 2011 वर्ल्ड कपनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shoaib akhtar

    पुढील बातम्या