लाहोर, 12 फेब्रुवारी : पाकिस्तान सुपर लीग 2021 (PSL 2021) ची सुरूवात 20 फेब्रुवारी पासून होणार आहे. त्याआधी पीएसएलने स्पर्धेचं ऍन्थम सॉन्ग लॉन्च केलं आहे. बुधवारी लॉन्च करण्यात आलेल्या या ऍन्थम सॉन्गचं नाव मेरा ग्रूव्ह असं आहे. या ऍन्थम सॉन्गला सोशल मीडियावर कमालीचं ट्रोल करण्यात येत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरही पीएसएल 6 च्या ऍन्थम सॉन्गवर चांगलाच भडकला आहे. हे गाणं बनवणारा अकलेने आंधळा आहे, अशी टीका शोएब अख्तरने केली आहे.
'मी यापेक्षा घाणेरडं गाणं ऐकलं नाही. हे काय होतं? पीसीबीने एवढं मोठं गाणं बनवलं. पण हे बनवायला सांगितलं कोणी? तुम्ही अकलेने आंधळे आहात, बहिरे आहात, गुंगे आहात, हे गाणं नक्की काय आहे? पीएसएलचं हे सगळ्यात खराब गाणं आहे. एवढं बेकार गाणं बनवून पीसीबीने खूप चांगलं काम केलं आहे,' असा टोला शोएब अख्तरने लगावला.
पीसीबीच्या ज्या सदस्याने हे गाणं बनवलं त्याचं नाव मला जाणून घ्यायचं आहे. हे गाणं ऐकून माझी मुलंही घाबरली आहेत. तीन दिवस मुलं माझ्याशी बोलत नाहीयेत. हे गाणं बनवणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शोएबने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.