मुंबई, 28 डिसेंबर : आयसीसी (ICC) ने रविवारी दशकाच्या सर्वोत्तम वनडे, टी-20 आणि टेस्ट टीमची घोषणा केली. आयसीसीने जाहिर केलेल्या या तीनही टीममध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला संधी मिळालेली नाही, त्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच संतापला आहे. भारतासमोर आयसीसीची हवा टाईट होते, त्यामुळे आयसीसीने वर्ल्ड टी-20 टीम नाही तर आयपीएलची टीम निवडली आहे, अशी टीका शोएब अख्तरने केली आहे. आयसीसीने दशकातल्या सर्वोत्तम टीममध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याला वनडे आणि टी-20 चा कर्णधार केलं आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) टेस्ट टीमचा कर्णधार आहे.
'आयसीसीला लाज वाटली पाहिजे'
शोएब अख्तर त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. 'आयसीसीने दशकाच्या सर्वोत्तम टी-20 टीमची घोषणा केली आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डही सदस्य आहे आणि टी-20 क्रिकेट पाकिस्तानही खेळतं, हे आयसीसी विसरली आहे. बाबर आझम टी-20 क्रिकेटमधला एक नंबरचा बॅट्समन आहे, पण तो टी-20 टीममध्ये नाही. विराट कोहली आणि बाबर आझमची तुलना करून बघा. हे खूप निराशाजनक आहे. आयसीसीला आयपीएल नाही तर जागतिक क्रिकेटची दशकातली सर्वोत्तम टीम निवडायची होती. आयसीसीला लाज वाटली पाहिजे,' अशी टीका शोएब अख्तरने केली.
'आयसीसीने पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला संधी दिली नाही. आम्हाला आयसीसीच्या दशकातल्या सर्वोत्तम टीमची गरज नाही. जागतिक क्रिकेटमध्ये एकही चांगला बॅट्समन आणि फास्ट बॉलर येत नाही. आयसीसीला फक्त पैशांची पडली आहे. भारतासमोर त्यांची हवा टाईट होते,' असं शोएब अख्तर म्हणाला आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये बाबर आझमची सरासरी सर्वाधिक आहे. त्याने 44 टी-20 मॅचमध्ये 50.93 च्या सरासरीने 1,681 रन केले आहेत. टी-20 मध्ये बाबर आझमच्या नावावर 16 अर्धशतकांचाही समावेश आहे.
भारताचे चार खेळाडू
आयसीसीने जाहीर केलेल्या या टीममध्ये भारताच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांनी टी-20 क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं आहे.
टी-20 टीम
रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
वनडे टीम
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा
टेस्ट टीम
एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर.अश्विन, डेन स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अंडरसरन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.