IPL 2019 : अवघ्या काही तासांत मुंबईचा ‘हा’ खेळाडू झाला करोडपती

IPL 2019 : अवघ्या काही तासांत मुंबईचा ‘हा’ खेळाडू झाला करोडपती

आयपीएलच्या लिलावात 20 लाखांची बेस प्राईज असलेला हा खेळाडू एक रात्रीत कोट्यधीश झाला. नेमकं काय घडलं एका रात्रीत?

  • Share this:

प्रियांका गावडे मुंबई, 20 मार्च : हृदयाचे ठोके चुकवणारे एकसो एक थरारक क्षण आणि एखाद्या हिंदी सिनेमात असावा तसा पुरेपूर मसाला म्हणजे आयपीएल. 2008नंतर आयपीएलमुळे क्रिकेटला चांगले दिवस आले, म्हणण्यापेक्षा खेळाडूंना चांगले दिवस आले असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. यातही अनेक जण आयपीएलच्या नकारात्मक बाबींविषयी भाष्य करतील त्यात काही वावगं नाही. पण याच स्पर्धेमुळे शेकडो नवोदित खेळाडू आज आर्थिकदृष्ट्या स्थिरावले. अनेक नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळले, सेलेब्रिटी खेळाडूंसोबत मैदानात सराव करण्याची संधी मिळाली आणि प्रसिद्धी मिळाली ते वेगळचं.

यातलाच एक रातोरात प्रसिद्धी मिळालेला मुंबईकर खेळाडू म्हणजे ‘शिवम दुबे’. ते म्हणतात ना, 'भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है'. असचं काहीसं शिवम बाबतीतही घडलं. आयपीएलच्या लिलावात 20 लाखांची बेस प्राईज असलेला हा खेळाडू एक रात्रीत कोट्यधीश झाला. नेमकं काय घडलं एका रात्रीत की, शिवमसाठी 5 कोटी देऊन त्याला विकत घेणं विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला भाग पाडलं?

तर झालं असं की, मुंबई संघाकडून रणजी खेळणाऱ्या शिवमनं आयपीएलचा लिलाव सुरू होण्याआधीच्या रणजी सामन्यात वडोदराच्या विरोधात सहा बॉलमध्ये पाच सिक्स मारून गोलंदाजांची पिसं काढली. या सामन्यात 76 धावा केल्या होत्या. या त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच मुंबईने तो सामना जिंकला आणि रातोरात हिरो ठरला तो शिवम.

याआधीही मुंबई टी-20 लीगमध्ये शिवमने प्रवीण तांबे या ज्येष्ठ गोलंदाजाला पाच सिक्स मारले होते. ही त्याची खेळी पाहून खरतरं तांबे तर चक्रावलाच पण टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी युवराज सिंहनंतर शिवमचं भारताचा धडाकेबाज फलंदाज अशी स्तुतीसुमनं उधळली. तर, तांबेने, हा मुलगा मोठा होणार असे भाकित केले आणि तसचं काहीसं झालं. आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या बेस प्राइजपेक्षा 25 पटीने जास्त किंमत देऊन शिवमला विकत घेण्यात आलं.

खरंतर शिवमला या लिलावात जास्तीत जास्त एक कोटींना विकत घेतले जाईल असे क्रिडाविश्लेषकांचं मत असताना, त्याच्याकरिता लागलेली ही पाच कोटींची बोली सर्वांसाठीच अनपेक्षित होती. 25 वर्षांच्या शिवमनं मुंबईकडून आतापर्यंत केवळ सहा सामने खेळले आहेत. या मॅचमध्ये त्याने 63.00च्या सरासरीने 2 शतकं तर 4 अर्धशतकं करत 567 धावा केल्या आहेत. एवढचं नाही तर, या 6 सामन्यातं 22 विकेट्सही त्याने घेतले आहेत. यंदाच्या आयपीएलकरिता शिवम हा महत्वाचा खेळाडू मानला जात आहे. एकूणच बंगळुरु संघाची परिस्थिती पाहता, शिवम सारख्या ऑलराऊंडर खेळाडूची त्यांना जास्त गरज आहे. कारण आतापर्यंत बंगळुरू संघ हा चोकर्स मानला जात असल्यामुळे यंदा पहिले आयपीएल जिंकवण्यासाठी शिवम हा महत्वाचा खेळाडू ठरू शकतो.

VIDEO : भाजप आणि मोहिते कुटुंबाबद्दल, रणजितसिंह यांच्या पत्नी म्हणाल्या...

First published: March 20, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading