विराटने संघातून वगळलेल्या खेळाडूचं वेगवान शतक, चौकार-षटकारांची आतषबाजी

विराटने संघातून वगळलेल्या खेळाडूचं वेगवान शतक, चौकार-षटकारांची आतषबाजी

शिवम दुबेने 67 चेंडूत 118 धावांची खेळी केली. त्यापैकी 88 धावा या षटकार आणि चौकारांच्या मदतीने केल्या.

  • Share this:

बेंगळुरू, 11 ऑक्टोबर : विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्धचा सामना कर्नाटकने जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने मनीष पांडे कर्णधार असलेल्या कर्नाटकला कडवी लढत दिली. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेनं वेगवान शतकी खेळी केली मात्र ती व्यर्थ गेली. त्याने 67 चेंडूत 118 धावा केल्या. मात्र, कर्नाटकच्या गोलंदाजांनी मुंबईला 303 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्नाटकने हा सामना 9 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने देवदत्त पडिक्कल, मनीष पांड्या आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 बाद 312 धावा केल्या होत्या.

कर्नाटकने दिलेल्या 313 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची आघाडीची फळी फारशा धावा करू शकली नाही. यशस्वी जयसवालने 22 धावा आणि आदित्य तारे 32 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 11 आणि सूर्यकुमार यादवने 26 धावा केल्या. मात्र, फलंदाज मोठी खेळी करण्यात अपय़शी ठरले. मुंबईचा अर्धा संघ 30 षटकांत तंबूत परतला होता. त्यानंतर शिवम दुबेने एका बाजुने फटकेबाजी करत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

शिवम दुबेनं तळातील फलंदाजांना हाताशी धरत धावांचा वेग वाढवला. त्यानं लिस्ट ए क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. 67 चेंडूत 118 धावा करताना त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. शिवमने फक्त चौकार षटकारांच्या सहाय्यानेच 88 धावा केल्या. त्याने 7 चौकार आणि 10 षटकार मारले. संघाच्या 277 धावा झाल्या असताना तो बाद झाला. त्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या.

अष्टपैलू खेळाडू असलेल्या शिवम दुबे त्याच्या तुफान फटकेबाजीमुळे अनेकदा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या टीमने 5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, 2019 च्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 4 सामन्यात संधी देण्यात आली. त्यानंतर त्याला संघातून बाहेरं बसवलं होतं. त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. मात्र, विजय हजारे ट्रॉफी आणि इंडिया ए कडून खेळताना त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे.

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

First Published: Oct 11, 2019 08:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading