Olympic Event Test : भारताचा ‘गोल्डन पंच’, रिंगमध्ये न उतरताच केली 7 पदकांची कमाई

Olympic Event Test : भारताचा ‘गोल्डन पंच’, रिंगमध्ये न उतरताच केली 7 पदकांची कमाई

ऑलिम्पिक टेस्टच्या बॉक्सिंगमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी, दोन सुवर्ण पदकांची कमाई.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : शिव थापा (63 किग्रॅ) (Shiv Thapa) आणि पूजा राणी (Pooja Rani) (75 किग्रॅ) यांनी गुरुवारी बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकत भारताचा झेंडा अटकेपार रोवला. तर, आशिष (69 किग्रॅ) याला अंतिम सामन्यात पराभव सहन करावा लागल्यामुळं रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

चारवेळा आशियाई पदक जिंकणारा थापा (Shiv Thapa) यानं कजाकिस्तानच्या राष्ट्रीय चॅम्पियन सनाताली तोलातायेव याच्यावर 5-0नं एकतर्फी विजय मिळवला. तर, आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या राणीनं ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. राणीनं यावर्षी आशियाई चॅम्पियन स्पर्धेत रजत पदक जिंकले होते.

वाचा-टी-20च्या जगज्जेतेपदासाठी 16 संघ सज्ज, भारतासह 'हा' संघ प्रबळ दावेदार

वाचा-सौरव गांगुली 'त्या' निर्णयावर ठाम, खेळाडू मास्क घालून मैदानात!

शेवटच्या दिवशी भारतानं जिंकले दोन सुवर्ण

आशिषला अंतिम सामन्यात जपानच्या सेवोन ओकोजावानं पराभूत केले. त्यामुळं भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याआधी माजी विश्व चॅम्पियन निकहत जरीन (51 किग्रॅ), सिमरनजीत कौर (60 किग्रॅ), सुमित सांगवान (91 किग्रॅ) आणि वाहलिमपुइया (75 किग्रॅ) यांना बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळं भारताला शेवटच्या दिवशी शिव थापा आणि राणी यांच्या रुपानं केवळ दोन सुवर्ण जिंकले.

स्पर्धेत भारतानं जिंकले सात पदक

निकहत जरीन सह सहा भारतीयांना रिंगमध्ये उतरण्याआधीच पदक निश्चित झाले आहे. या सर्व खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला. त्यामुळं जरीन शिवाय सिमरनजीत कौर (60 किग्रॅ), सुमित सांगवान (91 किग्रॅ) आणि वाहलिमपुइया (75 किग्रॅ), आशिष (69 किग्रॅ) आणि पूजा राणी (75 किग्रॅ) सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

वाचा-'टीम इंडियाचा सिलेक्टर देता होता अनुष्काला चहा', माजी क्रिकेटपटूचा आरोप

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Olympic
First Published: Oct 31, 2019 06:45 PM IST

ताज्या बातम्या