मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वडील कांबळीचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं विनोद, पण मुलीची टीम इंडियात निवड

वडील कांबळीचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं विनोद, पण मुलीची टीम इंडियात निवड

रेणुका ठाकूरची टीम इंडियात निवड

रेणुका ठाकूरची टीम इंडियात निवड

हिमाचल प्रदेशच्या आणखी एका मुलीची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. शिमल्याच्या सुषमा ठाकूरनंतर आता रेणुका सिंग ठाकूर (Renuka Singh Thakur) भारताचं प्रतिनिधीत्व करेल.

  • Published by:  Shreyas

शिमला, 25 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशच्या आणखी एका मुलीची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. शिमल्याच्या सुषमा ठाकूरनंतर आता रेणुका सिंग ठाकूर (Renuka Singh Thakur) भारताचं प्रतिनिधीत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. यासाठी पहिल्यांदाच रेणुका सिंग ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

रेणुकाचा जन्म हिमाचल प्रदेशच्या शिमला जिल्ह्यातील रोहुडूंच्या पारसा गावात झाला आहे. रेणुका जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं. आता ती वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. रेणुकाचे वडील केहर सिंग यांना आपली मुलगी क्रिकेटपटू व्हावी, असं वाटत होतं. माध्यमांशी बोलताना रेणुकाने हा क्षण आपल्यासाठी भावुक असल्याचं सांगितलं. तिच्या वडिलांना क्रिकेटवर खूप प्रेम होतं. याच कारणामुळे त्यांनी मुलाचं नाव विनोद ठेवलं. रेणुकाचे वडील विनोद कांबळीचे (Vinod Kambli) फॅन होते.

तिसऱ्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं

रेणुकाचे वडील सरकारी कर्मचारी होते. 1999 साली त्यांचं निधन झालं, यानंतर रेणुकाच्या आईला वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली आणि त्यांनी मुलांचं पालन पोषण केलं. रेणुका सध्या बंगळुरूमध्ये आहे. तिने रोहुडूंमध्येच स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला अॅकेडमीमध्ये तिची निवड झाली. रेणुका फास्ट बॉलर आहे, तिने एचपीसीएचे प्रशिक्षक पवन सेन यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले. 2019 साली तिने बीसीसीआयच्या महिला वनडे स्पर्धेत सर्वाधिक 23 विकेट घेतल्या होत्या. त्याच वर्षी तिची भारतीय महिला ए टीममध्ये निवड झाली होती.

रेणुकाच्या आधी हिमाचल प्रदेशच्या दोन महिला खेळाडूंची भारतीय टीममध्ये निवड झाली. शिमल्याच्याच सुन्नीमधली सुषमा वर्मा भारताकडून खेळली, सुषमाने वर्ल्ड कपमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. याशिवाय हरलीन देओलचीही हिमाचल रणजी टीममध्ये खेळल्यानंतर टीम इंडियात निवड झाली. हरलीन देओल मुळची चंडीगड मोहालीची आहे.

First published:

Tags: Cricket, Team india