मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धवनला बदनाम करू नको, न्यायालयाने पत्नी आयशाला स्पष्टच बजावले

धवनला बदनाम करू नको, न्यायालयाने पत्नी आयशाला स्पष्टच बजावले

धवनने पत्नीविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पत्नीकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धवनने याचिकेत म्हटलं होतं.

धवनने पत्नीविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पत्नीकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धवनने याचिकेत म्हटलं होतं.

धवनने पत्नीविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पत्नीकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धवनने याचिकेत म्हटलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 05 फेब्रुवारी : भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनला दिल्लीतील एका न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिखर धवनपासून वेगळी राहणारी पत्नी आयशा मुखर्जीला न्यायालयाने सुनावले आहे. शिखर धवनविरुद्ध सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसंच मित्रांसह नातेवाईकांकडे बदनामीकारक आणि अपमानास्पद बोलू नकोस असे न्यायालयाने तिला बजावले आहे. तसंच धवनला दर दिवशी त्याच्या मुलासोबत अर्धा तास व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवानगीही दिली.

शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी ऑगस्ट २०२० पासून वेगळे राहतात. शिखरने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, धवनने पत्नीविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. पत्नीकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धवनने याचिकेत म्हटलं होतं.

हेही वाचा : हे कुणी केलं? आपल्याच गोलंदाजी स्टाइलबद्दल वाचून अश्विनने विचारला प्रश्न

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिखर धवनने म्हटलं की, पत्नी माध्यमात त्याच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून क्रिकेटचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर पाटियाला हाऊस न्यायालयाने आदेशात म्हटलं की, धवनच्या पत्नीला पतीबद्दल काही तक्रार असेल, आक्षेप असेल तर याबाबत योग्य ठिकाणी तक्रार करण्यापासून रोखता येणार नाही. पण तिला धवनबाबतची तक्रार मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तींकडे करण्यापासून रोखता येईल. न्यायालयाने धवनकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आय़शा मुखर्जीला स्पष्टपणे बजावताना शिखर धवनच्या बाजूने निकाल दिला.

First published:

Tags: Cricket