Home /News /sport /

PHOTO : अनफिट रोहित शर्मा टीम इंडियाच्या गब्बरसोबत दिसला ट्रेनिंग करताना

PHOTO : अनफिट रोहित शर्मा टीम इंडियाच्या गब्बरसोबत दिसला ट्रेनिंग करताना

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू शिखर धवन(Shikhar Dhawan), रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि भुवनेश्वर कुमार(Bhuvneshwar Kumar) यांचे प्रशिक्षणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    नवी दिल्ली, 4 जानेवारी: नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (IND vs SA ODI) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर संघातील सदस्यांनी मुंबईमध्ये आपले ट्रेनिंग सेशन सुरु केले आहे. दरम्यान, टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखा जाणारा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan)त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सराव सत्राचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शिखरसोबत रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार( Bhuvneshwar Kumar) दिसत आहे. धवन आणि भुवनेश्वर यांनी शेवटचा वनडे सामना 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिसणार आहेत. या सामन्यापूर्वी, दोघे चांगलीच कंबस कसत आहेत. त्यांच्यासोबत रोहित शर्मादेखील दिसत आहे. धवनने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिघे एकत्र दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना मजेशीर कॅप्शनदेखील धवनने दिली आहे. 'या दोन चॅम्पियन्सना पाहून खूप आनंद झाला.  त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेणे नेहमीच मजेदार असते.' असे शिखरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. धवनने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 128 धावा केल्या होत्या. तर भुवनेश्वरने या मालिकेत तीन विकेट घेतल्या. तो केवळ दोन सामन्यात खेळला असला तरी भुवनेश्वरने आतापर्यंत 119 एकदिवसीय सामन्यांमध्ये 141 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने एकदा एका डावात पाच विकेट्सही घेतल्या आहेत. तर शिखरने 145 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6105 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 17 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. धवनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 143 धावा आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Rohit sharma, Shikhar dhawan

    पुढील बातम्या