• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • घटस्फोट आणि टीम इंडियातून वगळल्यानंतर shikhar dhawan ची भावनिक पोस्ट; म्हणाला...

घटस्फोट आणि टीम इंडियातून वगळल्यानंतर shikhar dhawan ची भावनिक पोस्ट; म्हणाला...

आयुष्यात घडलेल्या दोन लागोपाठ वाईट घटनांनंतरही शिखरनं (shikhar dhawan) आपलं मन खंबीर ठेवलं आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवरून तो स्व:ताला सावरत असल्याचे दिसत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवन (shikhar dhawan) सध्या अतिशय बिकट काळातून जात आहे. त्याच्यावर जणू काही दु:खाचा डोंगर कोसळला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगोदर त्याचा पत्नी आयशा मुखर्जीपासून (ayesha mukherjee) घटस्फोट झाला आणि दुसरं म्हणजे त्याला टी-20 विश्वकरंडक संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यानं याबाबत अजून काही बोललेलं नाही, पण अलीकडेच त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक गोष्ट शेअर केली आहे. धवनवर दु:खाचा डोंगर शिखर धवन (shikhar dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी लग्नाच्या 8 वर्षानंतर विभक्त झाले आहेत. आयशा मुखर्जीने आपल्या नवीन इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत माहिती दिली होती. आयुष्यातील एका मोठ्या घटनेला सामोरे जात असतानाच धवनसाठी आणखी एक वाईट बातमी आली. टी-20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची घोषणा झाली, मात्र यादीतून धवनचे नाव वगळण्यात आलं आहे. सध्या सगळी दु:खं त्याच्यावर एकाच वेळी कोसळली आहेत. धवनची ही पोस्ट आयुष्यात घडलेल्या दोन लागोपाठ वाईट घटनांनंतरही शिखरनं (shikhar dhawan) आपलं मन खंबीर ठेवलं आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवरून तो स्व:ताला सावरत असल्याचे दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो हसताना दिसत आहे आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हसत रहा कारण ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे'. आता आयपीएलमध्ये दिसेल धवनचा जलवा आयपीएलचे दुसरे सत्र आता 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. शिखर धवन सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये खेळत आहे. या घडलेल्या दोन वाईट गोष्टी विसरुन तो आयपीएलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देईल अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रामध्ये शिखर धवनने शानदार फलंदाजी केली होती. आठ सामन्यांमध्ये 54.28 च्या सरासरीने त्याने 380 धावा केल्या आहेत. त्याची फटकेबाजी दुसऱ्या सत्रात कशी होते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
  Published by:News18 Desk
  First published: