IPL 2019 : गब्बरची ही नेमबाजीपाहून तुम्ही व्हाल थक्क ! पाहा VIDEO

IPL 2019 : गब्बरची ही नेमबाजीपाहून तुम्ही व्हाल थक्क ! पाहा VIDEO

पंजाब विरुद्ध हाता तोंडाशी आलेला सामना दिल्लीनं गमावला.

  • Share this:

मोहाली, 2 एप्रिल : पंजाब विरुद्ध हाता तोंडाशी आलेला घास दिल्लीनं गमावला. पण हा सामना आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सर्वात रंजक सामना ठरला. एकीकडं सॅम करनच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तर दुसरीकडं पंजाबचा फलंदाज मयंक अग्रवाल याला शिखर धवननं आपल्या अनोख्या अंदाजात बाद केलं.

मयंक अग्रवाल याची ही विकेट फारच दुर्भाग्यपुर्ण होती. स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखा मयंक धावबाद झाला. सातव्या षटकात चोरटी धाव काढण्याच्या नादात पायात अडकत मयंक बाद झाला. पण यावेळी भारतीय संघाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन यांनं केलेली स्टम्पिंग आकर्षणाचा विषय ठरला. धवननं नॉन स्टाईकर एण्डवर बॉल थेट स्टम्पवर मारला आणि मयंकला रनआऊट केले. या विकेटनंतर मयंक अग्रवालाच विश्वास बसला नाही. मयंक 9 चेंडूत 6 धावा करत बाद झाला.

या विकेटनंतर रनआऊटची चर्चा सोशल मीडियावरही चांगलीच रंगली. नेटेकरांनी या विकेटची तुलना मांकड बाद सारखी केली. याआधी मुंबई विरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्यानं इशारा दिल्यानं मयंक मांकड आऊट होण्यापासून वाचला होता.

VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

First published: April 2, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading